Gautami Patil Emotional Appeal For Gargi Jadhav: नुकत्याच झालेल्या दहीहंडी (Dahi Handi 2026) उत्सवामुळे नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) चर्चेत आलेली. गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) नेहमीच आपल्या डान्स स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. पण, सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमीचं एक वेगळंच रुप सर्वांसमोर आलंय, ज्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
नृत्यांगणा गौतमी पाटील हिनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत एक चिमुकली आणि तिची आई दिसतेय. या चिमुकलीचं नाव गार्गी जाधव. या चिमुकलीला एका दुर्मिळ आजारानं ग्रासलंय. या आजारावर उपचारासाठी कोट्यवधींचा खर्च आहे. गौतमीनं चिमुकल्या गार्गीला कुशीत घेऊन एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये चिमुकलीच्या आईनं आजाराबाबत माहिती दिली असून त्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबतही सांगितलंय. हे सांगताना त्या माऊलीला रडू कोसळलं. साश्रू नयनांनी त्या माऊलीनं आपल्या पोटच्या लेकीसाठी मदतीचं आवाहन केलंय. गौतमीनंही सेलिब्रिटींनाही मदतीचं आवाहन केलंय.
View this post on Instagram
नृत्यांगणा गौतमी पाटील काय म्हणाली? (Gautami Patil Emotional Appeal VIDEO)
गौतमी पाटीलनं तिच्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिनं स्वतः जवळ घेतलंय आणि मदतीचं आवाहन केलंय. गौतमी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणालीय की, "नमस्कार मी गौतमी पाटील आणि आज माझ्याकडे गार्गी आलीय आणि गार्गीला काय झालंय हे तिची आई सांगेन... पुढे व्हिडीओमध्ये बोलताना गार्गीच्या आईनं तिला जडलेल्या गंभीर आजारपणाबाबत माहिती दिली. गार्गीच्या आईनं सांगितलं की, "छोट्याशा गार्गीला SMA Type 1 स्पाइनल मस्क्युलर अॅट्रॉफी हा दुर्मिळ आजार झालाय. तसंच या आजारामुळे शरीरातील स्नायू हळू हळू कमकुवत होतात. यावर उपचार घेण्यासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा खर्च असल्याचं सांगितलं जातंय. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबाला ही किंमत उभी करणं अशक्य आहे, त्यामुळे आम्हाला तिला वाचवण्यासाठी तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे..." आपल्या चिमुकलीच्या आजाराबाबत सांगताना गार्गीच्या आईला अश्रू अनावर झाले.
पुढे बोलताना गौतमी पाटील हिनं देखील सर्वांकडे मदतीची मागणी केलीय. सेलिब्रिटींचा खास उल्लेख करत मदत करण्याची विनंती केलीय. तसंच चाहत्यांना जमेल तशी मदत करण्याचं आवाहन तिने केलय. व्हिडीओ शेअर करत गौतमीनं "आपली एक मदत त्या चिमुकलीचा जीव वाचवू शकतो. सगळ्यांनी गार्गीला मदत करायची आहे...", असं कॅप्शन दिलंय. सोशल मीडियावर गौतमीनं केलेली पोस्ट व्हायरल होतेय.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.