CM Devendra Fadanvis on Rani Mukharjee: अलीकडेच झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukharjee )मराठमोळा साज करत मंचावर आली. पुरस्कार स्वीकारताना थेट मराठीत बोलायला सुरुवात केली. तिचा मराठमोळा अंदाज सगळ्यांनाच भावला. आता 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीबाबत केलेली पर्यटन विभागाची एक तक्रार मिश्किलपणे पोहोचवली. राणी मुखर्जीच्या 'आती क्या खंडाला' गाण्यावरून ते बोलत होते. अलीकडेच मुंबईत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जीला प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.


काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? (CM Devendra Fadnavis on Rani Mukharjee)


या पुरस्कार सोहळ्याविषयी आणि ज्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. अभिनेत्री राणी मुखर्जीविषयी बोलताना त्यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. ते म्हणाले 'राणी मुखर्जी यांनी तीस वर्षांपूर्वी एक वेगळ्या प्रकारचा झंजावात हिंदी चित्रपटसृष्टीत आणला. नंतर स्त्रीकेंद्रीत भूमिकांकडे त्यांचे लक्ष केंद्रित झालं.भूमिकेतील सत्यता शोधून त्यांनी भूमिका निवडल्या.मर्दानीमुळे स्त्रीकेंद्रीत पात्र ही लोकांना भावलं. आता मर्दानी3 हा त्यांचा चित्रपट आलेला आहे. आता मर्दानी 4, मर्दानी 5 येईल, अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊयात. त्यांना पुरस्कार मिळणार आहे हे समजल्यानंतर आमच्या पर्यटन विभागाने मला सांगितलं, की त्यांच्याकडे एक तक्रार करा- ही तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती तक्रार अशी आहे - त्यांनी फक्त खंडाळ्याचं प्रमोशन केलं आहे. आपल्याकडे इतके वेगवेगळे प्रेक्षणीय स्थळ आहेत, आता त्या स्थळांचं प्रमोशन तर कधी करणार आहेत हे एकदा त्यांना आपल्याला विचारायचं आहे. त्या पण नक्कीच विचारू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.







राणी मुखर्जी मराठीतून नेमकं काय म्हणाली? (Rani Mukerji Speech In Marathi Language)


बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीनं आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. मराठीतून बोलताना राणी मुखर्जी म्हणाली की, "माझ्यासाठी महाराष्ट्र एका राज्य नाही... महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे... आणि माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे..."


पुढे बोलताना राणी मुखर्जी म्हणाली की, "मी मायानगरी मुंबईमध्ये जन्मले... मी माझा यश, अपयश सर्व इथेच पाहिलं... प्रत्येक क्षण इथेच जगले... हे पारितोषक राजकपूर यांच्या नावानं मला दिलं जातंय, याचा मला अभिमान आहे. मी लहान वयात सिनेसृष्टीत आले, त्यावेळेस माहीत नव्हतं मला कुठपर्यंत जायचंय... मी देशातील महिला आणि तिची शक्ती सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय... कॅरेक्टर निवडताना नेहमीच मी समाजावर त्याचा पडणारा प्रभाव  पाहते. सिनेमाला कधीच मी फक्त प्रोफेशन म्हणून पाहिलं नाही, ते माझ्यासाठी एक इमोशन आहे..."

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.