बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण तसेच परिचारिका व कर्मचाऱ्यांवर अरेरावी करत शिवीगाळ केल्याच्या गंभीर प्रकरणात कल्याण न्यायालयातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी रमेश म्हात्रे यांच्यासह पाच जणांविरोधात दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.


या प्रकरणातील सरकारी वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या मान्यतेबाबत आता न्यायालयात सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर या खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात होईल. दरम्यान, सुनावणीपूर्वी रमेश म्हात्रेंसह सर्व पाचही आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्राचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली होती. वकिलांची ही विनंती मान्य करत न्यायालयाने आरोपींना आगामी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत मंजूर केली आहे. त्यामुळे आता येत्या 15 सप्टेंबरपासून शास्त्रीनगर मारहाण प्रकरणाच्या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.