पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यात बाहेरील राज्यांतून आणि लगतच्या जिल्ह्यांतून येणाऱ्या भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या तस्करीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मागील ८ ते १२ दिवसांपासून या संशयास्पद गाड्यांवर पाळत ठेवली जात होती. या गुप्त मोहिमेअंतर्गत कारवाई करत प्रशासनाने सुमारे ३९ लाख ४३ हजार रुपये मूल्याचा खवा व पनीरचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाई प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितलं की, 6 वाजता गाड्या आल्या, त्यामध्ये खवा आणि पनीर होते. पनीर 12 हजार 500 किलो 27000 लाख किंमतीचे आहे. तर 11 लाखांचा खवा जप्त करण्यात आला आहे. पनीरच्या गाड्या कर्नाटकातून आल्या होत्या आणि खव्याच्या गाड्या वाशीमधून आल्या होत्या. सगळ्यांचे बिल तपासले जाणार आहेत आणि ज्यांचे बिल आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वीस ते पंचवीस विक्रेत्यांना हा खवा आणि पनीर पुरवला जाणार असल्याची माहिती आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर याबाबत खवा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.(paneer and khava seized in Pune)
तर वाशीतील शेतकरी बन्सी डोईफोडे यांनी बोलताना म्हटलं की, हा खवा ओरिजनल आहे, यात कोणतीही भेसळ नाही. आम्ही स्वतः तयार केलेला खवा आहे, मी स्वतः घेऊन ते घेऊन आलेलो आहोत. गाई म्हशीच्या दुधापासून खवा बनवून आणलं आहे. माझं 40000 रूपयांचं नुकसान झालं आहे. खव्याचा सॅम्पल तपासणीत फेल झाला तर आम्हाला फाशी द्या, शेतकऱ्याचा व्यवसाय आहे. गावात सोयी सुविधा नाही शेतकरी स्वतः मेहनत करून खवा तयार करतो तो पुण्यात आणतो. तुकाराम मुंडेंनी काही नियम शिथिल केले पाहिजेत. शेतकऱ्यांना फटका बसत आहे, व्यापाऱ्यांना फटका बसत नाहीये.
पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून 4 ट्रक पनीर-खवा जप्त करण्यात आले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या या ॲक्शनने एकच खळबळ उडाली आहे. एफडीएच्या पथकाने पुण्यातील बुधवार पेठेत धडक कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा (Pune News) जप्त केला आहे. मोठ्या प्रमाणातील हा साठा पाहता कारवाईसाठी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्त्रोताबाबत तपास सुरू आहे. गणेशोत्सवात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. (FDA Action In Budhwar Peth Pune)
या कारवाईदरम्यान बार्शीच्या दिशेने आलेला सुमारे ४,६० किलो खवा जप्त करण्यात आला असून याची बाजारभावानुसार किंमत ११ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. हा खवा अत्यंत अस्वच्छ (Unhygienic) वातावरणात, २० किलोच्या गठ्ठ्यांमध्ये गोणपाटाच्या पोत्यांत (Gunny Bags) लपेटून आणला जात होता. या खव्याचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित साठा नष्ट (Destroy) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दुसऱ्या कारवाईत कर्नाटक सीमेवरील बेळगाव आणि बागलकोट भागातून पुण्यात प्रवेश करणाऱ्या दोन गाड्यांमधून तब्बल १२,५०० ते १२,६०० किलो पनीर जप्त करण्यात आले. या पनीरची एकूण किंमत २७ लाख ८३ हजार रुपये इतकी आहे. यामध्ये मलाई पनीर, लो-फॅट पनीर आणि मिडीयम-फॅट पनीर अशा तीन प्रकारच्या साठ्याचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या पनीरमधील फॅटचे प्रमाण संशयास्पद असून ते मानवी आरोग्यास असुरक्षित (Unsafe) असण्याची दाट शक्यता आहे.
तपासणीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हा सर्व साठा पुणे शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या २५ ते ४० व्यापाऱ्यांनी व मिठाईवाल्यांनी विक्रीसाठी मागवला होता. अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेल्या सर्व साठ्याचे नमुने राज्य प्रयोगशाळेत पाठवले आहेत. लॅबोरेटरी अहवालात हे अन्नपदार्थ भेसळयुक्त किंवा 'अनसेफ' आढळल्यास 'अन्न सुरक्षा व मानके कायद्या'च्या 'सेक्शन ५९' अंतर्गत संबंधित पुरवठादार, खरेदीदार आणि विक्रेत्यांवर थेट गुन्हे व खटले दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.