बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






आपल्या लाडक्या गणरायाचे पुढील काही दिवसांत आगमन होणार आहे. त्यामुळे मिठाई, पेढे व मोदक आणि इतर खाद्य पदार्थांच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी पुण्यात मोठी कारवाई केली आहे. मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने बुधवार पेठ परिसरातून तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे पुणे शहरातील अन्न व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


सणासुदिच्या काळात खाद्यापदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि संभाव्य भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली असून, जप्त केलेल्या साठ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे या पदार्थांची गुणवत्ता आणि त्याच्या साठ्याच्या स्त्रोतासंबंधीत कसून तपास केली जाणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.


महाप्रसाद वाटपासाठी एफडीएच्या कडक मार्गदर्शक सूचना


यासोबतच सणासुदीच्या काळात ठिकठिकाणी होणारे महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर एफडीएने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार सामूहिक अन्नवाटप किंवा भंडारा आयोजित करण्याच्या किमान सात दिवस अगोदर अन्नवाटप पूर्वसूचना घेण्यात यावी. तसेच अन्न तयार आणि वितरित करण्यासाठी परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर आणि स्वयंपाकगृहांचीच मदत घेणे आवश्यक असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.


अन्न तयार करताना सुरक्षित पिण्याचे पाणी, योग्य तापमान नियंत्रण, कच्चे व शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, अन्न हाताळणाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अन्न साठवणूक करण्याचे सक्त निर्देशही एफडीएकडून देण्यात आले आहेत. दरम्यान अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजित महाप्रसाद, भंडारा किंवा अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये मिळणारी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी FDA आणि शासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.