बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आज अशा स्थानावर आहेत, जिथे पोहोचण्याचं अनेक कलाकार स्वप्न पहात असतात. त्यांचा आवाज, त्यांचा अंदाज आणि अभिनयाने अनेक पिढ्यांपासून लोक त्यांचे चाहते आहेत. वयाच्या 80 व्या वर्षानंतरही ते अविरत काम करत असून दरवेळेस काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतात. पण एवढं मोठं यश मिळवूनही मनात अशी एखादी खंत राहिली जी विसरताच येत नसेल तर ? 84 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा एका गोष्टीचा उल्लेख केला, जे ऐकून चाहतेही भावूक झाले. (All Photos : Social Media)
वयाच्या 84व्या वर्षी शहेनशाहने त्यांच्या अशा एका इच्छेचा खुलासा केला, जी पूर्ण न करू शकल्याची खंत आजही त्यांना आहे. अमिताभ यांनी सांगितलं की, त्यांना नेहमीच संगीत शिकण्याची आणि वेगवेगळी वाद्यं वाजवण्याची इच्छा होती; मात्र त्यांचं हे स्वप्न आजपर्यंत अपूर्णच राहिले.
नुकत्याच ‘कौन बनेगा करोड़पति 18’च्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी आपल्या या अपूर्ण इच्छेबद्दल सांगितले. शोमध्ये कंटेंट क्रिएटर कृतज्ञ नय्यर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘धिस ऑर दॅट’ हा मजेदार गेम खेळण्याची इच्छा व्यक्त केली. देशात अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठा कंटेंट क्रिएटर दुसरा कोणी नाही. त्यांच्यासोबत गेम खेळल्यास रीलही तयार होईल आणि फॉलोअर्सही वाढतील, असं त्यांनी गमतीने म्हटलं.
यानंतर कृतज्ञ यांनी अमिताभ यांना एक खास प्रश्न विचारला. आयुष्यातील एखादा जुना दिवस पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर ते कोणता दिवस निवडतील? किंवा असा कोणता अनुभव आहे, जो त्यांनी आजपर्यंत घेतलेला नाही पण तो घेण्याची त्यांची नेहमीच इच्छा होती? असं त्यांनी बिग बी यांना विचारलं.
त्यावर अमिताभ यांनी त्यांच्या आयुष्यातील अपूर्ण इच्छेबद्ल सांगितलं. माझ्या आयुष्यात इतक्या घटना घडल्या आहेत की कोणता दिवस पुन्हा जगायला आवडेल, हे सांगणं कठीण आहे. मात्र, संगीत शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती, जी अजून पूर्ण झाली नाही, असं त्यांनी नमूद केलं.
मला संगीत कधीच शिकता आलं नाही, याची खंत आहे. जेव्हा मी एखाद्याला सितार किंवा हार्मोनियम वाजवताना पाहतो किंवा एखाद्या गायकाचं सुंदर गाणं ऐकतो, तेव्हा माझ्या मनात विचार येतो की, हे लोक इतके सुंदर कसे गाऊ किंवा वाजवू शकतात? कारण मी स्वतः कधीही संगीताचे प्रशिक्षण घेतलं नाही, असं अमिताभ यांनी नमूद केलं.
विशेष म्हणजे, बिग बींच्या घरी संगीत शिकण्यासाठी आवश्यक असलेली अनेक वाद्यंही आहेत. अमिताभ ती वाद्यं जपून ठेवतात. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर फुलांच्या माळाही चढवतात. कधीतरी संगीत शिकू शकेन, अशी आआश अजूनही त्यांच्या मनात आहे.
मात्र, पुढे आपल्या वयाचा उल्लेख करताना अमिताभ बच्चन भावूक झाले. त्यांनी सांगितलं की, आता 84 वय झालंय, तरीही त्यांना संगीत शिकता आलेले नाही. आयुष्यात अनेक मोठी स्वप्ने पूर्ण केल्यानंतरही संगीत शिकण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.