अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरील 'वीण दोघातही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकांमध्ये सोज्वळ आणि प्रसंगी खंबीर भूमिका साकारणाऱ्या तेजश्री च्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अनेकदा ती मुलाखतींमध्ये आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने बोलताना दिसते. अभिनेता शशांक केतकर सोबत घटस्फोट झाल्यानंतर आता 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा तेजश्री प्रधान लग्न करायला तयार आहे. सिने तडकाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला आहे. 'तुला असं वाटतं का की तू आता प्रेमात पडू शकतेस?' असा प्रश्न तेजश्रीला विचारण्यात आला. त्यावर लगेच तेजश्रीने 'नक्कीच ' असं उत्तर दिलं. तुला सेटल व्हायला आवडेल का असेही तिला विचारल्यानंतर तिने हसत 'का नाही ? नक्कीच.. ' असं उत्तर दिलं. शशांक केतकरसोबत घटस्फोट झाल्यानंतर तेजश्री दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करत नव्हती.मात्र आता अकरा वर्षानंतर आपण पुन्हा प्रेमात पडायला तयार आहोत असं तिने सांगितलं. लग्न आणि प्रेमाबद्दल तेजश्री ने केलेल्या विधानानंतर चाहते तेजश्रीच्या आयुष्यात कोण येणार याची वाट पाहत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.