Sairaab Actor Rohit Chandel Got Bail: जुलै महिन्यात आलेल्या एका बातमीनं मनोरंजन विश्वात खळबळ माजली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) टेलिव्हिजनचा संस्कारी अभिनेता रोहित चंदेल (Actor Rohit Chandel) याला बेड्या ठोकलेल्या. एका 16 वर्षांच्या मुलीचा पाठलाग करणं, तिला वारंवार फोन करणं, त्रास देणं आणि तिला मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्यावर लावण्यात आलेला. या प्रकरणी अभिनेत्याविरुद्ध 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला. 


'पांड्या स्टोअर' आणि 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित चंदेलनं जवळपास दोन महिने तुरुंगात घालवले. मीडिया रिपोर्टनुसार,  या अभिनेत्याला जामीन मंजूर झाला असून 11 सप्टेंबर 2026 रोजी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आलेली.


दोन महिन्यांनंतर अभिनेत्याला जामीन (Actor Rohit Chandel Got Bail)


'एबीपी न्यूज'च्या वृत्तानुसार, घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पोक्सो (POCSO) प्रकरणात रोहित चंदेलला जामीन मिळाला आहे. सध्या त्याच्या सुटकेची कागदोपत्री प्रक्रिया सुरू आहे. 29 वर्षीय अभिनेत्याला 10 जुलै रोजी पंत नगर पोलिसांनी दहिसर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती.


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप 


अटक केल्यानंतर अभिनेत्याला विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. एफआयआरनुसार (FIR), अल्पवयीन मुलीनं नकार देऊनही आरोपीनं तिला आपल्या वैयक्तिक क्रमांकावरून आणि इतर मोबाईल क्रमांकांवरून वारंवार फोन केले. तक्रारीत पुढे असाही आरोप करण्यात आलाय की, 5 जुलै रोजी अभिनेत्यानं मुलीला हाऊसिंग सोसायटीजवळ अडवलं, तिचा पाठलाग केला, तिच्याशी वाद घातला, तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर कथितरीत्या हल्ला केला. 


पाठलाग करणं आणि दुखापत पोहोचवणं यासंबंधीत गुन्हा


पोक्सो कायद्याव्यतिरिक्त, त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 78 आणि 115 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कलमं पाठलाग करणं आणि स्वेच्छेनं दुखापत पोहोचवणं यांच्याशी संबंधित आहे.


रोहित चंदेल यांच्या चार्जशीटमध्ये त्रुटी


यापूर्वी, रोहित चंदेल याला जामीन मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागलेला, कारण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमधील काही त्रुटी चिंतेचा विषय ठरल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, चार्जशीटमध्ये त्याचा व्यवसाय 'अभिनेता' ऐवजी चुकीच्या पद्धतीनं 'व्यावसायिक' असा नमूद करण्यात आला होता आणि त्याचा धर्मही चुकीचा नोंदवला गेला होता. त्याच्या वैद्यकीय नोंदींमध्येही एक त्रुटी आढळलेली. त्यात त्यांची वैवाहिक स्थिती 'विवाहित' अशी दाखवण्यात आलेली, तर आपण अविवाहित असल्याचा दावा अभिनेत्यानं केलाय.



Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.