Maharashtra Weather Updates: यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज (Maharashtra Rain News) वर्तवण्यात आला होता. त्यातच आता सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला तरी पावसाचा पत्ता नाही. पावसाळ्याचे तीन महिने सरले, पण राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने अपेक्षित हजेरी लावली नाही. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, सोलापूरसह राज्यातील अनेक भागांवर दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झालंय. त्यातच ऑगस्टपासून पावसाने दिलेली मोठी ओढ आता शेतकऱ्यांच्या काळजावर घाव घालू लागलीय. सोयाबीन, कापूस, मका, बाजरीसह ज्या पिकांवर शेतकऱ्याचं वर्षभराचं गणित अवलंबून असतं. तीच पिकं आता पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. तर दुसरीकडे परिस्थिती इतकी गंभीर आहे की मोठ्या जलाशयांमधील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर पोहोचलीय. अशातच आता हवामान विभागाने (IMD) पावसासंदर्भात मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा (Maharashtra Rain) परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नसून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain News: 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. तर विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.
Maharashtra Rain: 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 12 सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता आहे.
13 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
14सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यलो अलर्ट जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विजांचा कडकडाट होईल.
इतर महत्वाच्या बातम्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.