[ad_1]

शंकर देवकुळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : काल मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचा पहिला मुक्काम पाटोद्यात पडला. मध्यरात्री त्यांनी समाज बांधवांशी हितगूज साधला. आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. त्यातच त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली. तर मुंबई पोलिसांनी त्यांचा परवानगी अर्ज प्रलंबित ठेवत त्यांना नोटीस बजावली. मुंबईतील आंदोलनाचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात आला आहे. तर आग्रही मागणीनंतर जरांगे यांना सलाईन सुरू करण्यात आले आहे. या घडामोडींना वेग आलेला असतानाच प्राध्याक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर सांगलीत जोरदार टीका केली आहे.

जरांगेंचे आंदोलन नौंटकी

ओबीसी आरक्षण संपलेलं आहे असे ठाम मत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार नाहीत. हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे असा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील लोकांनी जरांगेंना मोठं केल्याचे ते म्हणाले.

सांगलीच्या तानाजी पाटील यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आपल्या मुलाला सभापती केला असल्याचा गंभीर आरोप प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी करत मी मराठा नाही हे आटपाडीच्या तानाजी पाटील यांनी जाहीर करावं असं जाहीर आव्हान लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

दौंडमार्गे मुंबई गाठणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दौंडमार्गे मुंबईकडे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोर कमिटीतील सदस्य आणि नेते प्रदीप साळुंखे यांनी दौंड येथे मराठा बांधवांची बैठक घेतली. यावेळी जळांगे पाटील जास्त वेळ थांबणार नाहीत कारण त्यांची तब्येत खराब आहे. समाज बांधवांनी माझ्यासोबत येऊ नये असे आव्हान देखील जरांगे पाटलांनी केले आहे, असे ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावे

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावे. गणेश उत्सवात मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांनी आता त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले. काही लोकांना 2029 पर्यंत काहीच मुद्दे नसल्यामुळे ते अशा पद्धतीने आंदोलनाला उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी विरोधकांसाठी काहीच मुद्दे ठेवले नाहीत, असा दावाही पाटील यांनी केला.



[ad_2]

Source link

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.