अलीकडेच अभिनेत्री आंचल खुरानाने तिचं घर दाखवलं. अभिनेत्री आंचल मुंबईत वन बीएचकेमध्ये राहते. तिच्या महिन्याचं भाडं 70 हजार रुपये आहे.बाल्कनीतून बाहेर पाहिलं तर समुद्र किंवा हिरवळ नव्हे, एका विस्तीर्ण चाळीचं दृश्य दिसतं. एवढ्या बजेटमध्ये इतकंच मिळत असल्याचं तिने म्हटलं.अभिनेत्रीने तिच्या महागड्या लक्झरी हॅन्डबॅग दाखवल्या त्यानंतर तिची बेडरूम एक छोटी खोली पाहुण्यांसाठी ठेवलेला बेड दाखवला. मनोरंजन विश्वात 14 वर्षांहून अधिक काम करू नये मुंबईत स्वतःच घर घेणे हे अजून स्वप्नच असल्याचं तिने सांगितलं. वाढती महागाई आणि इंडस्ट्रीतील परिस्थिती पाहता मुंबईत स्वतःच घर घ्यायला अजून चारशे पाचशे वर्ष लागतील असं ती म्हणाली. 'या घराचं भाडं 70 हजार रुपये आहे.हे घरा अजिबात ॲस्थटिक नाही. हे आमचं छोटसं किचन आहे जागा कमी आणि सामान जास्त असल्याने मला वॉशिंग मशीन इथेच ठेवावी लागते.' असं तिने सांगितलं.




नंतर अभिनेत्रीने तिची बेडरूम दाखवली.लोक त्यांच्या खोला स्वच्छ करतात आणि त्यांच्या घराचा व्हिडिओ बनवतात पण मी जशी राहते तसंच घर दाखवते आहे.मी त्या घाणेरड्या वासात राहते एखादा डुकरासारखी, त्याच वासात लोळते .माझ्या घरात इतक्या खिडक्या आहेत की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.' आंचलने सांगितलं की तिचा फ्लॅट तेराव्या मजल्यावर आहे.सध्या आंचल खुराना कलर्स वाहिनीवरील 'तू जुलिएट जट्ट दी' या मालिकेत काम करते. पंधरा वर्षांपासून ती इंडस्ट्रीत काम करते आहे.आंचलला वयाच्या 26 व्या वर्षी रुदयविकाराचा झटका आला होता. 



दरम्यान 'बॉलिवूड बबल'ला एका मुलाखतीत बोलताना तिने इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊच आणि सेलिब्रिटींच्या नात्यावर केलेल्या खुलाशांमुळे मोठी खळबळ उडाली होती. ती म्हणाली 'इथे एका लहानशा कारणावरूनही कलाकाराला मालिकेतून किंवा कामावरून काढलं जातं.तुम्ही कोणासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, तरी तुम्हाला रिप्लेस केलं जातं.स्वतःच्या स्वाभिमानासाठी भांडलात तर तुम्हाला कामावरून काढतात.तुमची शूटिंगचा दिवस कमी करतात.आम्ही रोज सकाळी नव्या आशेने उठतो.ऑडिशन देतो आणि दररोज संध्याकाळी रिजेक्शन किंवा इतरांचे तुलना करत झोपायला जातो.माझी ऑडिशन उत्तम होऊ नये मला अनेकदा रिजेक्शन मिळालं आहे.' असं अभिनेत्री आंचल म्हणाली.



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.