UPI Payment Charges OTT: सध्या युपीआयचा (UPI) जमाना आहे. युपीआय पेमेंटवर शुल्क जाहीर केले जाणार आहे. ज्यानुसार, 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर आता 0.4 MDR चार्ज द्यावे लागेल. तसेच जे लोक युपीआय ऑटोपेद्वारे OTT सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरतात, त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की, या नवीन मर्चंट डिस्काऊंट रेटमुळे नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ किंवा इतर कोणत्याही स्ट्रीमिंग (OTT) सेवेचा वापर केल्यास, मंथली बिलमध्ये वाढ होऊ शकेल का? नेमकं खरं काय? या रिपोर्टमधून थेट आकडेवारी समजून घेऊयात.
जर ओटीटी अॅप्सचं पेमेंट तुम्ही ऑटो पेमेंटमध्ये ठेवले असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला कोणतेही शुल्क भरावा लागणार आहे. 2000पेक्षा जास्त पेमेंट केल्यावरही ऑटोमेटेड रिकरिंग स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ज्याला(ऑटोपे) असं म्हटलं जातं यावर निश्चित एमडीआर व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच मंथली यूटिलिटी बिल, OTTस्ट्रीमिंग सब्सक्रिप्शन आणि सर्व प्रकारच्या रिकरिंग इन्वेस्टमेंटसाठी ऑटोमेटेड रिकरिंग ट्रान्सफरसाठी कोणतेही निश्चित एमडीआर शुल्क लागू होणार नाही.
याचा अर्थ असा आहे की, जर ओटीटी सबस्क्रिप्शनचे पेमेंट UPIऑटो पे सुविधाद्वारे केले जात असेल, पेमेंटची रक्कम 2000रुपयांपेक्षा जास्त असेल तरीही, नवीन 0.4 टक्के एमडीआर शुल्क लागू होणार नाही.
15 ऑगस्ट 2026 पासून, 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या युपीआय 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआर लागू केला आहे. दरम्यान, 75 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांवर 300 रुपयांचे शुल्क आकारले जाईल. पण 'पर्सन टू पर्सन' ट्रान्सफर MDRमधून वगळलेली असतील. सरकारने यावर भर देत म्हटलं की, ग्राहकांकडून थेट युपीआय व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही. हे MDR मर्चंट पेमेंट इकोसिस्टममध्ये लागणारे एक चार्ज आहे. ते असे शुल्क नाही, जे वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी QR स्कॅन करताना किंवा पेमेंट करताना भरावे लागेल.
MDRमधील बदलांमुळे OTTच्या ऑटो - पे व्यवहारांसाठी ग्राहकांवर कोणतेही अतिरिक्त चार्ज लागत नाही. सबस्क्रिप्शनचे दर हे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारेच ठरवले जातात. कंपन्या त्यांच्या प्लॅन्स, टॅक्स आणि इतर लागू शुल्कांमध्ये बदल करु शकतात. त्यामुळे जर भविष्यात तुमच्या ओटीटी बिलामध्ये काही बदल झाल्यास, तर असे गृहित धरु नका की, युपीआय MDRचा खर्च तुमच्यावर लादले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.