Film Censor Board Reconstitutes 18 New Members: केंद्र सरकारनं (Central Government) 'सेन्सॉर बोर्ड' (Censor Board) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन'ची (CBFC) पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेअंतर्गत अनेक नामवंत आणि अनुभवी कलाकारांचा बोर्डात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) प्रीती झिंटा (Preity Zinta) आणि अभिनेता पंकज त्रिपाठी यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश करण्यात आलाय. या फेरबदलांनंतर सेन्सॉर बोर्डात एकूण 18 नव्या सदस्यांची भर पडली आहे.
बोर्डात समाविष्ट झालेले सदस्य (Film Censor Board Reconstitutes 18 New Members)
या यादीत प्रीती झिंटा, सुनील शेट्टी (Suniel Shetty), रूपाली गांगुली (Rupali Ganguly), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), बंगाली अभिनेता प्रसेनजित चॅटर्जी (Bengali Actor Prosenjit Chatterjee), मनोज जोशी (Manoj Joshi), विनोद अनुपम (Vinod Anupam), अभिषेक जैन (Abhishek Jain), रिकी केज (Ricky Kej), प्रियदर्शन (Priyadarshan), हंसराज हंस (Hansraj Hans), सुप्रिया यारलागड्डा (Supriya Yarlagadda), यतींद्र मिश्रा (Yatindra Mishra), नीला पांडा (Nila Panda), रमेश पतंगे (Ramesh Patange) आणि वामन केंद्रे (Waman Kendre) यांचा समावेश आहे.
In exercise of the powers conferred under Cinematograph Act the Central Government has reconstituted the Central Board of Film Certification @shashidigital pic.twitter.com/cjY2lyhCIP
— CBFC केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (@CBFC_Bharat) September 16, 2026
नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि लेखक रमेश पतंगे यांचा पुन्हा समावेश
सेन्सर बोर्डाच्या नव्या पॅनलमध्ये टेलिव्हिजन आणि प्रादेशिक सिनेसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. यात एका बाजूला प्रीती झिंटा, सुनील शेट्टी आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांचा समावेश करण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली यांचाही समावेश आहे. सीबीएफसीची (CBFC) पुनर्रचना यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली होती. त्यानंतर नव्या पुनर्रचना न झाल्यामुळे, त्या मंडळाचे सदस्य 2020 नंतरही आपल्या पदांवर कार्यरत राहिले. नियमांनुसार, मंडळाची पुनर्रचना होईपर्यंत विद्यमान सदस्य आपल्या पदावर कायम राहू शकतात.
मागील पॅनलमध्ये विद्या बालन, चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री, वामन केंद्रे, रमेश पतंगे, माजी फुटबॉलपटू मिहिर भुतिया, अभिनेत्री गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी टिकू, जीविता राजशेखर, चित्रपट निर्माते टी. एस. नागभरण आणि चित्रपट निर्माते नरेश चंद्र लाल यांचा समावेश होता.
दरम्यान, रुपाली गांगुली 2024 मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या. त्या एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री असून 'अनुपमा' मालिकेसाठी विशेष ओळखल्या जातात. दुसरीकडे, पल्लवी जोशी या विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी आहेत. त्यांनी 'द काश्मीर फाइल्स' सिनेमाची निर्मिती केली होती.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.