एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विरोधात एका तरुणीने गुन्हा दाखल केला आहे. आमदाराने शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे शारीरिक अत्याचार केल्याचे तरुणीने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने पिडीत तरुणीस आपल्या कार्यालयात बोलावून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथे येऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून सामूहिक शारीरिक अत्याचार केल्याचे पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
२२ वर्षांच्या पिडीत विवाहित तरुणी हिचा पती सोबत वाद असल्याने त्या वादात मध्यस्ती करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा साथीदार बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे आपल्या खाजगी मालमत्ता येथे घेऊन येत तिला शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.
पडित तरुणी गेली काँग्रेस नगरसेविकेकडे
रात्री दोन वाजता माजी आमदार नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील याने सुद्धा या पिडीत तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटील यांच्या घरचा केअर टेकर याने पिडीत तरुणीला तिच्या घरी आणून सोडले. घाबरलेल्या पिडीत तरुणीने १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा तरुणीने आपल्यावर भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील याने अत्याचार केल्याचे व त्या संबंधी आपल्याकडे व्हिडीओ व मोबाईल व्हॉट्सॲप चॅट असल्याचे दाखविले. त्यानंतर पिडीत तरुणीला घेऊन रात्री कांचन कुलकर्णी पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मला आता न्याय द्यावा. यांनी अशा पद्धतीने किती महिलांचे आयुष्य उध्वस्त केले असेल त्यामुळे यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीत तरुणीने केली आहे.
पिडीत तरुणीने माझ्या इंस्टाग्राम अकाऊंड वरील मोबाईलवर संपर्क साधून मदत मागितली. मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद हकीकत सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन हादरली. तिच्या जवळील व्हिडीओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पिडीत तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना रात्री संपर्क केल्यानंतर त्यांनी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिर यांनी रात्री उशिरा सर्व खातरजमा करून शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंतु ही घटना अत्यंत निंदनीय काळिमा फासणारी असून देशात आणि राज्यात लाडकी बहीण म्हणून डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा माजी आमदार अशा पद्धतीने कृत्य करीत असेल तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर परदेशी महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी तर स्वतःच्या आईला शस्त्राचा धाक दाखवून तिच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करून बळकावली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. यांना ४८ तासात अटक न झाल्यास हजारो महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नगरसेविका गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.