पराग खोत


दरवर्षी श्री गजाननाचे आगमन होते आणि त्याबरोबरच मराठी रंगभूमीवरही नव्या नाट्यपर्वाची चाहूल लागते सणासुदीची लगबग ओसरत नाही तोच रंगमंचावर नवे पडदे उघडू लागतात नवे विषय प्रेक्षकांना साद घालू लागतात आणि कलाकारांच्या जुन्यानव्या जोड्या उत्सुकता वाढवू लागतात यंदाचा ऑक्टोबर महिना तर या दृष्टीने विशेष रंगतदार ठरणार आहे. ‘कोड मंत्रनंतर खूप वर्षांनी आणि चारचौघी च्या यशानंतर मुक्ता बर्वेचे नवेकोरे नाटक, ‘आमने सामने’च्या अभूतपूर्व गर्दीनंतर लीना भागवत-मंगेश कदम ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा आणि डॉ. विवेक बेळे यांच्या लेखणीतून आलेले पहिले व्यावसायिक नाटक ‘माकडाच्या हाती रॉम्पेन या तीन नाटकांनी रंगभूमीवरच्या या नव्या पर्वाची उत्सुकता वाढवली आहे.


सोबतच अभिनय बेर्डे आता ‘शुभं करोति या नाटकातून आपल्यासमोर येतोय. सीमा देशमुख आणि हृषिकेश जोशी हे ज्येष्ठ कलावंत या नाटकात असणार आहेत आणि त्याचे लेखक आहेत आपल्याला कवी म्हणून परिचित असलेले वैभव जोशी. इतर दोन मोठ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकाच्या तालमी सुरू आहेत. त्यांची घोषणा लवकरच होईल. मुक्ता बर्वे हे नाव मराठी रंगभूमीसाठी केवळ लोकप्रिय अभिनेत्रीचे नाही, तर आशयपूर्ण आणि वेगळे विषय रंगमंचावर आणणाऱ्या कलाकाराचेही आहे. ‘कोड मंत्र मध्ये तिने साकारलेली अहिल्या देशमुख ही व्यक्तिरेखा विशेष गाजली होती. हे नाटक नेहमीच्या मनोरंजनाच्या चौकटीपलीकडे गेले होते. मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांच्या अभिनयाला त्यावेळी विशेष दाद मिळाली होती


त्यानंतर ‘चारचौघी मधून मुक्ता पुन्हा रंगभूमीवर आली आणि प्रशांत दळवी लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या गाजलेल्या नाटकाला नव्या पिढीसमोर आणखी एकदा जिवंत केले. १९९१ मध्ये आलेल्या या नाटकाने स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीचे स्वातंत्र्य, विवाहसंस्था आणि स्वतःच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार यांसारख्या विषयांना थेट भिडवले होते. चारचौघी’च्या यशानंतर मुक्ता आता ‘पुन्हा नक्की भेटू या नव्या नाटकातून रंगभूमीवर येत आहे. देबू बर्वे लिखित या नाटकात तिच्यासोबत प्रियदर्शन जाधव अंशुमन विचारे आणि आरती वडगबाळकर आहेत, तर मीरा वेलणकर दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे चारचौघी सारख्या गाजलेल्या नाटकानंतर मुक्ता कोणत्या नव्या आशयातून प्रेक्षकांसमोर येते. याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. एकीकडे तिच्या मागील भूमिकांची छाप आहे आणि दुसरीकडे नव्या नाटकाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे आव्हान आहे.


दुसरीकडे ‘आमने सामने ने लीना भागवत आणि मंगेश कदम या दोन कसलेल्या कलाकारांची रंगमंचावरील केमिस्ट्री पुन्हा एकदा अधोरेखित केली. नीरज शिरवईकर लिखित दिग्दर्शित हे नाटक अजूनही गर्दी खेचतंय. नाटकाच्या शीर्षकातच संघर्ष, संवाद आणि दोन बाजूंमधील टक्कर दडलेली असताना कलाकारांच्या अभिनयातून त्याला मिळालेला रंगतदारपणा हे त्याचे वैशिष्ट्च ठरले. त्यानंतर आलेल्या सई परांजपे लिखित दिग्दर्शित ‘इवलेसे रोप फारशी चमक दाखवू शकले नाही. आता याच लीना भागवत मंगेश कदम जोडीला प्रश्न थोडा नाजूक आहे मध्ये पुन्हा पाहता आणि अनुभवता येणार आहे. मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नव्या नाटकाकडून त्यामुळे अपेक्षा निर्माण होणे साहजिक आहे दोन अनुभवी कलाकार एकत्र आल्यावर विनोद असो, नातेसंबंध असोत किंवा एखादा गंभीर प्रश्नः त्याला रंगमंचावरची सहजता आणि अभिनयाची धार मिळण्याची शक्यता वाढते. मात्र आमने सामने च्या यशाची पुनरावृत्ती करण्यासोबतच नवे नाटक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते का? हे पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे.


या सगळ्या धावपळीत डॉ. विवेक बेळे यांचे ‘माकडाच्या हाती रॉम्पेन हे नाव पुन्हा एकदा कानावर आलंय नुकतंच त्यांच्या ‘काटकोन त्रिकोण या नाटकाने पुनरागमन केलंय. माकडाच्या हाती शॅम्पेन या डॉ. बेळे यांच्या लेखणीतून आलेल्या नाटकाचा पूर्वीचा प्रयोग विनोद, सामाजिक भाष्य आणि प्रसंगनाट्य यांच्या अचूक मिश्रणासाठी ओळखला गेला होता. जुन्या प्रयोगात आनंद इंगळे, संदेश कुलकर्णी, संदेश जाधव आणि शर्वाणी पिल्ले यांच्या भूमिका होत्या. यावेळी कलाकारांची घोषणा अद्याप बाकी असल्याने या नाटकाभोवतीचे कुतूहल आणखी वाढले आहे मंगेश कदम दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत तर लीना भागवत निर्मात्या आहेत. ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ सारख्या नावातच विवेक बेळे यांच्या ‘लॉजिकल ह्यूमर’ची झलक दिसते. हास्य निर्माण करताना त्यामागे एखादी विसंगती, एखादा सामाजिक संदर्भ किंवा माणसाच्या वर्तनातील गंमत शोधण्याची त्यांची शैली यापूर्वीही अनेक नाटकात जाणवली आहे. त्यामुळे नव्या संचातून या नाटकाला कोणता रंग मिळतो, हे पाहणेही रंजक ठरेल.


एका बाजूला सध्या सुरू असलेली शिकायला गेलो एक, भूमिका, लग्न पंचमी, आता थांबवायचं कसं? आमच्या पिढीची गोष्टच वेगळी, सांगा कसं जगायचं? आणि ही दोस्ती तुटायची नाय ही नाटके यशस्वीपणे प्रवास करत आहेतः चिरंजीव

परफेक्ट बिघडलाय’ आणि ‘ठरलंय फॉरएव्हर’, ‘वरवरचे वधूवर’ आणि ‘बनवाबनवीं सारखी नव्या दमाच्या तरुण

कलाकारांची नाटके प्रेक्षकांशी नाते जोडत आहेतः तर दुसऱ्या बाजूला ऑक्टोबरमध्ये पुन्हा नक्की भेटू, प्रश्न थोडा नाजूक

आहे, आणि ‘शुभं करोति अशी नवी नाटके आणि ‘माकडाच्या हाती शैम्पेन हे पुनरुज्जीवित नाटक रंगभूमीवर येत आहे.

मराठी रंगभूमीचे हेच तर वैशिष्ट्य आहे इथे जुन्याला नव्याची जोड मिळते आणि नव्याला जुन्याच्या अनुभवाची साथ. एकीकडे प्रस्थापित कलाकार, दुसरीकडे नव्या जोड्याः एकीकडे गंभीर विषय, तर दुसरीकडे निखळ बुद्धिमान विनोदः आणि या सगळ्यांच्या मध्यभागी उत्सुकतेने बसलेला प्रेक्षक! त्यामुळे यंदाचा ऑक्टोबर केवळ नाटकांच्या नव्या शुभारंभांचा महिना नाही. तर मराठी रंगभूमीच्या वैविध्याचा उत्सव ठरणार आहे पडदा उघडल्यावर काय दिसणार? कोणती कथा मनाला भिडणार? कोणती जोडी टाळ्या मिळवणार आणि कोणते नाटक प्रेक्षकांच्या चर्चेत राहणार याची उत्तरे आता ऑक्टोबरमध्ये पडदा उघडल्यानंतरच मिळणार आहेत.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.