बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






मराठवाडय़ाच्या रखडलेल्या विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास, तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन करण्यात आले. 17 सप्टेंबर, मुक्तिसंग्रामदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाचा समारोप होणार असून, सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्तालयासमोर होणाऱया धरणे आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.


मराठवाडय़ाच्या विकास आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सुभाष पाटील, लक्ष्मणराव वडले, बबनराव थोरात, चेतन कांबळे, राहुल पाटील, कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


स्थळ – विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर


वेळ – सकाळी 11.30 वा.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.