वृत्तसंस्था/ भुवनेश्वर


ओडिशा राज्यातील सुंदरगढ जिल्ह्यात गंजाम येथे पुराच्या पाण्यात सहा बालके वाहून गेल्याची माहिती तेथील स्थानिक पोलिसांनी दिली आहे. ओडिशातील नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने बहुतेक सर्व नद्यांना पूर आला आहे. चार लाख लोग या पूरपरिस्थितीमुळे बेघर झाल्याची स्थिती आहे. गंजाम येथील पुरात सहा मुले वाहून गेली असून त्यांना वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. बचाव कार्यासाठी आपत्कालीन साहाय्यता दलांच्या काही तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. गंजाम येथेही अनेक नागरिक पुरामुळे विस्थापित झाल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि विस्थापितांना साहाय्यता करण्यासाठी विविध संस्थांचे साहाय्य घेतले आहे. विस्थापितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.


यंदा भारताने अनेक स्थानी मान्सूनचा पाऊस पुरेसा न पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये दुष्काळाची किंवा दुष्काळसदृश स्थिती आहे. तथापि, ओडिशा राज्य हे या स्थितीला अपवाद ठरले असून या राज्याने आतापर्यंत नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती देण्यात आली.


बिहार, उत्तर प्रदेशातही पूरस्थिती


ओडिशाप्रमाणे बिहार आणि उत्तर प्रदेशातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये जवळपास सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हजारो लोक विस्थापित झाले असून काही खेड्यांचा संपर्क तुटला आहे. उत्तर प्रदेशातही जवळपास सर्व धरणे ओसंडून वाहत आहेत. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे.






Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.