Actress Disco Shanthi Health Update: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (South Indian Film Industry) ज्येष्ठ अभिनेत्री 'डिस्को शांती' (Actress Disco Shanthi) सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती समोर आली आहे. कधीकाळी बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांचं काळीज हेलावलं आहे.  


डिस्को शांती यांची प्रकृती खालावली (Disco Shanthi Health Update)


दिग्गज अभिनेत्री डिस्को शांती यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत मोठी लोकप्रियता मिळवली होती. जवळपास तीन दशक सिनेमांपासून दूर राहिल्यानंतर त्या पुन्हा एकदा पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, त्यांनी रुग्णालयातील एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केलंय. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या फोटोंमध्ये त्यांच्या नाकात मेडिकल ट्यूब लावलेली दिसतेय. मात्र, या पोस्टमध्ये त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचं कारण किंवा आजाराबाबतचा कोणताही तपशील दिलेला नाही. त्यामुळे, हे फोटो पाहून चाहते त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत.



अभिनेत्रीला डिस्चार्ज मिळाला (Disco Shanthi Discharge From Hospital)


फोटोंमध्ये अभिनेत्री डिस्को शांती रुग्णालयात दिसत असून त्यांच्या नाकात ट्यूब लावलेली दिसतेय. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना त्यांनी आपण आता घरी परतल्याची माहिती दिली. पण, या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.                                         


अभिनेत्री डिस्को शांती कोण? (Who Is Actress Disco Shanthi?)


डिस्को शांती यांचा जन्म 1965 मध्ये तमिळ अभिनेते सी. एल. आनंदन यांच्या घरी झाला; त्यांचे मूळ नाव शांता कुमारी असे होते. 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. 1983 मधील 'वसंतमे वरुगा' (Vasanthame Varuga) या तमिळ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्यांनी तमिळ, कन्नड, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि ओडिया चित्रपटांमध्ये काम केले. त्या तेलगू अभिनेते श्रीहरी यांच्या पत्नी होत्या आणि त्यांना दोन मुले आहेत. 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पतीचे निधन झाले, त्यानंतर डिस्को शांती यांनी चित्रपटसृष्टीतून बऱ्याच अंशी माघार घेतली.                                  

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.