Kedar Shinde Announces Gana Dhaav Re: रंगभूमी आणि सिनेमातील दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde)  आपल्या  प्रोजेक्टसाठी ओळखले जातात.  त्यांनी काही दिवसांपूर्वी 'गणा धाव रे' (Gana Dhav Re)  या सिनेमाची घोषणा केली.  त्यांच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. केदार शिंदे यांनी अलिकडेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी 'गणा धाव रे' या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख आणि सिनेमाच्या स्टारकास्टबाबत जाहीर केलं. तसेच  या सिनेमाबाबत त्यांनी एक किस्साही शेअर केला.  हा सिनेमा त्यांच्याकडे कसा आला? याबाबत माहिती त्यांनी पोस्टमधून (Entertainment) शेअर केली आहे.  हा सिनेमा कधी रिलीज होणार? केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमधून (Social Media Post) नेमकं काय शेअर केलं? पाहूयात.


केदार शिंदे यांची आगामी चित्रपटाबाबत पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Kedar Shinde Announces Gana Dhaav Re Release Date)


 केदार शिंदे यांनी सोशल मीडियात 'गणा धाव रे' या सिनेमाचा पोस्टर शेअर केला. तसेच पोस्टला लांबलचक कॅप्शनही दिलं आहे. केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'गणपती बाप्पा मोरया.  काही गोष्टी आपण करतोय, असा आपला एक गैरसमज असतो. पण  स्क्रिनप्ले हा परमेश्वरानेच लिहिलेला असतो. आपण फक्त परफॉर्मन्स देत असतो.  या चित्रपटाच्याही निमित्तानेही तेच काहीसं घडलं. गणपती बाप्पांनी अचानक दिलेला प्रसाद हाती पडला.  मी माझ्या सिनेमाच्या तयारीत होतो. अचानक हा सिनेमा माझ्या हाती आला.  बीलाइव्ह प्रोडक्शनकडून प्रस्ताव आला होता'.





 


 

 



 

 


View this post on Instagram


 



 

 

 



 

 



 

 

 




 

 


A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)







'गणपती उत्सवाच्या काळात 'गणा धाव रे'  या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जाहीर होतेय.  हा देखील गणपती बाप्पांचा एक प्रसादच आहे.  एक प्रयत्न केला, आवडेल याची खात्री आहे.  कारण साक्षात देव भक्तांच्या हाकेला धावून येणार आहेत 'गणा धाव रे'...', असं केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये एक अभिनेत्री आणि तिच्यासोबत गणपती बाप्पा दिसत आहे. काही दिवसांपासून ती अभिनेत्री कोण? हे गुलदस्त्यात होतं. दरम्यान, आता केदार शिंदे यांनी अभिनेत्रीला टॅग केलं आहे.  केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये प्रणाली घोगरे हिला टॅग केलं आहे. हिची या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहे. प्रणाली घोगरे व्यतिरिक्त या सिनेमात, भरत जाधव,  भार्गवी चिरमुले,   काजल काटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2026 रोजी  प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची स्टोरी काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, केदार शिंदे आपल्या आगामी सिनेमासाठी उत्सुक आहेत. प्रणाली घोगरेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने आपल्या कारकि‍र्दीत हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.    तिला हिंदी मालिकांमधून विशेष प्रसिद्धी मिळाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Salman Khan Ganpati Visarjan: गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.