नवी दिल्ली : चार टिनएजर मुलांनी १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीतून समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी तिघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. हत्येनंतर पीडितेची बॉडी दिल्लीच्या बाह्य भागातील स्वरुप नगर येथील एका शेतात फेकून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.




चौघा आरोपींपैकी १७ वर्षांचा मुलगा पीडितेचा "मित्र" होता. ती त्याला भेटायला गेली होती. इतर तीन आरोपी हे त्या १७ वर्षांच्या मुलाचे मित्र होते. ही घटना गेल्या शुक्रवारी घडल्याची माहिती आहे. स्थानिक रहिवाशांना कुत्रे आणि इतर प्राणी एका शवावर हल्ला करताना दिसल्यानंतर, रविवारी सकाळी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मुलीचं शव सापडलं.




उजवा हात गायब, चेहरा विद्रूपपोलिसांनी सांगितले की, त्यांना रविवारी सकाळी रोडजवळील शेतात एक शव सापडल्याची माहिती मिळाली. तिचा देह विद्रूप अवस्थेत होता; उजवा हात गायब होता आणि कुजल्यामुळे चेहरा आणि पोटाचा भाग विद्रूप झाला होता.




"केवळ दोन दिवस झाले असूनही, मृतदेह वेगाने कुजत होता – कदाचित उघड्यावर असल्याने हवामानाचा त्यावर परिणाम झाला असावा. चेहरा ओळखण्यापलीकडे गेला होता. वैद्यकीय अहवालात अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्या शरीरावर आठ जखमा आढळल्या. असे दिसते की तिची हत्या करुन तिला त्या भागात टाकण्यात आले, तिथे प्राण्यांनी त्यावर हल्ला केला" असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.




वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला त्या मुलीची ओळख पटू शकली नाही. त्यानंतर तपास पथकांवर तिची ओळख पटवण्याची आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. कुटुंबाचा जबाब आणि शवविच्छेदनाच्या निष्कर्षांच्या आधारे, पोलिसांनी हत्या, अत्याचार आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मुलीच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या.




५० हून अधिक सीसीटीव्ही फूटेज तपासलेशेताच्या आसपास घडलेल्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान संशयित वेळेच्या आसपास घटनास्थळाजवळ एक टेम्पो फिरताना पोलिसांना दिसला. त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता, परंतु स्थानिक चौकशीमुळे पोलिसांना अखेरीस तो टेम्पो ओळखण्यास मदत झाली.




पोलिसांनी चौकशीसाठी चालकाला ताब्यात घेतले असता त्याने सांगितले की त्याचा १७ वर्षांचा धाकटा भाऊ अनेकदा तो टेम्पो वापरत असे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेम्पोमध्ये चार तरुण मुले असल्याचेही दिसून आले. या मुलांची ओळख पटली, पण ते आपल्या घरातून पळून गेले होते.




आधी अल्पवयीन मित्राने अत्याचार केलापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख पटली असून शिवम गणेश (वय १९) आणि १७ व १६ वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुले आहेत. गुन्ह्यात वापरलेले दोन चाकू आणि आरोपींनी परिधान केलेले कपडे जप्त केले. किमान तिघा आरोपींनी केल्याची कबुली दिल्याचे दोन पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.




मिळालेल्या माहितीनुसार, तो अल्पवयीन मुलगा शुक्रवारी रात्री त्या १७ वर्षीय मुलीला भेटायला गेला होता. त्यानेच तिच्यावर सर्वप्रथम अत्याचार केला; त्यानंतर तिने या गुन्ह्याची तक्रार पोलिसात करण्याची धमकी दिली. तेव्हा त्याने आपल्या मित्रांना बोलावले, त्यांनी तिला बळजबरीने ताब्यात घेतले आणि आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते.




"अत्याचार केल्यानंतर त्यांनी तिला एका शेतात नेले आणि सहापेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले. त्यांनी तिची बॉडी पालापाचोळा आणि चिखलाखाली लपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते टेम्पोमधून पळून गेले. अत्याचार वाहनाच्या आत झाला की शेतात, याचा आम्ही तपास करत आहोत" असेही त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.




पालकांना कल्पनाही नव्हतीपोलिसांनी सांगितले की, त्या मुलीने शाळा सोडलेली होती. काही वर्षांपूर्वीच स्वरूप नगरमध्ये राहायला आली होती. ती आपल्या पालकांना आर्थिक मदत करण्यासाठी नोकरीच्या शोधात होती. ती त्यांच्यापासून वेगळी राहत होती. त्यामुळे आपली मुलगी बेपत्ता असल्याची पालकांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे तिच्या बेपत्ता झाल्याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.