मुंबई : मुंबईतील वडाळा पश्चिमेकडील बाळकृष्ण सुळे मार्गावर असलेल्या एका बांधकाम साईटवर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीमधील लिफ्टच्या डक्टमध्ये तोल जाऊन पडल्यानं संजय लिंबुनस मिंज (वय 37) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 10 सप्टेंबर रोजी पहाटे 1 ते 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीच्या सहाव्या मजल्यावर झोपण्यासाठीयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे मुळात त्या बांधकाम साईटवर कामगार नव्हते. ते त्यांच्या दोन मित्रांसह तेथे काम करणाऱ्या आपल्या भाच्याला भेटण्यासाठी आले होते. 10 सप्टेंबरच्या रात्री हे चौघेही एकत्र जेवले आणि त्यानंतर त्याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास संजय मिंज यांचा अचानक तोल गेला आणि ते सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसलेल्या लिफ्टच्या डक्टमध्ये थेट खाली कोसळले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बांधकाम साईटवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना नाहीतघटनेची माहिती मिळताच घेतली. प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीनुसार आणि एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कंत्राटदाराने कामगारांसाठी सुरक्षित लेबर कॅम्प उभारला नव्हता. तसेच बांधकाम साईटवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. अत्यंत धोकेदायक परिस्थितीत कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याचं स्पष्ट झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास माटुंगा पोलीस करत आहेत.
मुंबईकर दाम्पत्याला उडवलं"मुलांना बिघडवणाऱ्या आणि समाजासाठी धोका निर्माण करणाऱ्या कृतींवर आळा घालणे आवश्यक आहे" असे निरीक्षण नोंदवत, ५ फेब्रुवारी रोजी आपल्या वडिलांची कार भरधाव वेगाने चालवून एका स्कूटरला धडक देत एकाचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. या अपघातात दुचाकीस्वार व्यावसायिक ध्रुमिल पटेल यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कायमच्या दिव्यांग झाल्या आहेत.
सत्र न्यायालयाने तो आदेश रद्द केलामुंबईतील विद्याविहार येथे झालेल्या या अपघाताप्रकरणी पोलिसांनी त्या चालकाला (जो त्यावेळी १७ वर्षे ८ महिन्यांचा होता) अटक केली होती. ६ मार्च रोजी ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डच्या दंडाधिकाऱ्यांनी त्याला जामीन मंजूर केला होता, परंतु सत्र न्यायालयाने तो आदेश रद्द केला.