मुंबई - अभिनेत्री राधिका आपटेनं अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. या सिनेमातील अभिनेत्रीच्या इंटिमेट सीनचीही चर्चा झाली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत राधिकानं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.
झूमला दिलेल्या एका राधिका आपटेनं सांगितलं की, ती 'हे करू शकते!' (बोल्ड सीन्स) असं गृहीत धरलं गेलं. याबद्दल बोलताना राधिका म्हणाली की, 'सुरुवातीला मी असे चार-पाच चित्रपट केले होते, ज्यामध्ये मी पूर्णपणे नग्न होते. त्यामुळे अनेकांना वाटायचं, ही तर करेलच ना. म्हणून मला त्यांना सांगावं लागतं, ऐका, मी खरं तर हे करणार नाही. कारण मी हे आधी केलं आहे, त्यामुळे आता मला याबद्दल आणखी माहिती आहे आणि मला विचारावंसं वाटतं, तुम्हाला हे का हवंय? तुम्हाला मला आताच त्याला किस करायला का सांगायचं आहे? यावर ते म्हणतात, कर ना थोडंसं. अनेकांकडून मला हेच उत्तर मिळतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. फक्त थोडंसं किसिंग, १५ सेकंदांचं इम्प्रोव्हायझेशन आहे. यावर मी म्हणाले, सॉरी, काय?'
राधिकानं सांगितला अनुभवअभिनेत्रीनं पुढे एक धक्कादायक प्रसंगही सांगितला. राधिका म्हणाली की, 'एका सेटवर मला विचारण्यात आलं, तुम्ही हा अॅक्शन सीक्वेन्स करू शकता का? शर्टची बटणं लावली नाहीत तर? मी म्हणाले, हा अॅक्शन सीक्वेन्स आहे. मग शर्ट घालणारच ना? हे तर बेसिक फिजिक्स आहे. त्यावर ते म्हणाले, 'फक्त अंतर्वस्त्रे घालून हा सीन केला तर?' हे ऐकून मी म्हणाले, तुम्ही माझ्याकडून नक्की काय करून घेण्याचा प्रयत्न करताय?
राधिकाने यापूर्वी २०१६ च्या 'पार्च्ड' एका सीनवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलं होतं. राधिका म्हणाली, 'मी निराश झाले नाही. मला इंटिमेट सीनची पर्वा नाही. मी या सगळ्याची काळजी करत नाही. मला माहित होतं की, माझ्या भूमिकेसाठी मला असे सीन करावी लागतील. मीडिया ज्याप्रकारे याबद्दल बोलत राहिली त्याचं मला आश्चर्य वाटलं. मी या गोष्टींचा फारसा विचार करत नाही. चित्रपट या सीनपेक्षा खूप मोठा आहे.'
राधिका आपटेचं वैवाहिक जीवनराधिका आपटेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिनं २०१२ मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. त्यांचं लग्न खूप खाजगी होतं. २०२४ मध्ये राधिका आणि बेनेडिक्ट एका मुलीचे पालक बनले.