इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील केकेडे नगर येथे सादिया अहमद काजी (वय 26) या विवाहित महिलेनं सासू-सासरे आणि पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात सासू सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वडील फारुक कासीम जमादार (वय 46, रा. उमरगा, जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे.
पैशांसाठी सतत तगादातरुण विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्यानं व्यक्त होत आहे. वडील फारुक जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलं आहे की, 'सादिया काजी या विवाहित तरुणीला सासू-सासरे आणि पती नेहमी टोमणे मारत होते. 'तू हेंद्री आहे, तुला काम जमत नाही, स्वयंपाक करता येत नाही', असे टोमणे मारत होते. तसेच 'पतीच्या व्यवसायात पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये', असा सतत तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून सादिया काजी हिने गुरुवारी रात्री सोलापुरातील राहत्या गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. फिर्याद देताना वडील देखील ढसाढसा रडले.
पती सासू अन् सासऱ्याविरोधात गुन्हा दाखलएम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यात यांचे वडील फारुक जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमद काझी (पती) शकील काजी (सासरे) आणि सबीया काजी (सासू) यांच्याविरोधात बीएन एस 80, 85, 115(2),352,3(5) प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
विवाहितेला सतत त्रास; माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा'व्यवसायात नुकसान झाल्यानं माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये', म्हणून तगादा लावत. तसेच 'तुला स्वयंपाक जमत नाही', असं हिणवत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ झाला. त्याला कंटाळून 26 वर्षीय सादिया काझी या विवाहितेनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्च 2023 रोजी सादियाचा विवाह झाला होता. लग्नानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सासरच्या मंडळींनी संगनमत करून तिचा छळ सुरू केला.
'तुला घरातील काम व स्वयंपाक जमत नाही''तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला घरातील काम व स्वयंपाक जमत नाही', असं म्हणून तिला सतत टोमणे मारले जात होते व शिवीगाळ करून मारहाण केली जात होती. तसेच व्यवसायात नुकसान झाल्यानं 'माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये', अशी मागणी करत तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या सततच्या जाचाला कंटाळून सादियाने गुरुवार 17 सप्टेंबर रोजी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. एम.आय.डी.सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे करत आहेत.