तिरुअनंतपुरम: केरळमध्ये सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. या सतत मुसळधार पावसामुळे केरळच्या उंच डोंगराळ भागात एक दुर्घटना घडली. पावसामुळे झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मुसळधार पावसात एका तात्पुरत्या शेतातील शेडचा आश्रय काही जणांनी घेतला. यावेळी डोंगराचा काही भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडली. इडुक्की जिल्ह्यातील वट्टावाडा येथील कोट्टाकंबूरमध्ये ही घटना घडली.




काय घडलं नेमकं ?चिन्नम्मा आणि तिचा भाऊ बालाचंद्रन हे दोघेही कोट्टाकंबूरचे रहिवासी आहे. या दोघांचा या भूस्खलनात मृत्यू झाला. तर मरिअम्मा ही महिला गंभीर जखमी झाली. स्थानिक आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी त्यांना ढिगाऱ्याखालून काढले आणि तिला उपचारासाठी रुग्णालायात दाखल केले आहे. या घटनेतील पीडित लोक हे कपडे सुकवण्यासाठी आणि वाट पाहण्यासाठी जवळच्या शेडमध्ये गेले होते. मात्र शेडच्यावरचा डोंगर इतक्या अचानक कोसळेल याची कल्पनाही त्यांना नव्हती, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.







स्थानिकांनी तात्काळ केले बचावकार्यमोठ्या आवाजात दगड आणि चिखल शेडवर पडला. यामुळे शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि काही क्षणातच पीडित ढिगाऱ्याखाली गाडले गेले. असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मोठा आवाज आल्यामुळे स्थानिक लोक तात्काळ घटनास्थळी धावून गेले. त्यांना एक शेड ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे दिसताच तात्काळ बचावकार्य सुरु केले. सततच्या पावसामुळे आणि अवघड भूभागामुळे सुरुवातीला बचावकार्य काठी वाटत होते. मात्र स्थानिकांनी स्वतःच चिखल बाजूला करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र चिन्नम्मा आणि बालाचंद्रन यांचा रुग्णालयात जात असतांना वाटेत मृत्यू झाला. तर मरिअम्मा यांना बचाव पथकाने घटनास्थळीच प्रथमोपचार दिले आणि नंतर रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.




नागरिकांना सावध राहण्याचं आवाहनया घटनेनंतर शोध आणि बचावकार्य अधिक तीव्र करण्यासाठी पोलीस, महसूल अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रहिवाश्याना या डोंगराळ भागात रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. डोंगराच्या उतारावर किंवा नदीकाठी धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी किंवा मदत छावणीत स्थलांतर करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसात विविध सीमावर्ती भागांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.






Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.