सुर्योदय आणि चंद्रोदय परिवर्तिनी एकादशीचे महत्त्वचातुर्मासातील भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी अर्थात 'परिवर्तिनी एकादशी', या एकादशीला 'पद्मा एकादशी' किंवा 'वामन एकादशी' असे ही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात योगनिद्रेत असलेले भगवान श्रीविष्णू परिवर्तिनी एकादशीला कूस बदलतात.
पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान श्रीविष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण करण्यासाठी वामन रूप धारण केले होते. त्यामुळे या दिवशी श्रीहरीच्या वामन अवताराची विधिवत पूजा देखील परिवर्तिनी एकादशीला केली जाते. पुराणात असे सांगितले आहे की, परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्यामुळे अजाणतेपणी घडलेल्या पापांचा नाश आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. पद्म पुराणात या एकादशीचे महत्त्व सांगितलेले आहे.असे सांगतात की, योगनिद्रेत असलेले भगवान श्रीविष्णु जेव्हा कुस बदलतात तेव्हा त्यांची मुद्रा प्रसन्न असते आणि त्या कालावधीत भक्तिभावाने आणि विनम्रतेने केलेली प्रार्थना विशेष फलदायी असते. म्हणूनच भगवान विष्णूंची आराधना, व्रत आणि भक्तीसाठी परिवर्तिनी एकादशी खास मानली जाते.
परिवर्तिनी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त परिवर्तिनी एकादशीचे मुख्य व्रत मंगळवार, 22 सप्टेंबर 2026 रोजी केले जाणार आहे.
जलझुलणी एकादशी का म्हणतात?परिवर्तिनी एकादशीला 'जलझुलणी एकादशी' या नावानेही ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार असे सांगतात की, परिवर्तिनी एकादशीला माता यशोदा नदीवर जाऊन श्रीकृष्णाचे वस्त्र धूत असत. त्यामुळे या एकादशीचा संबंध पाण्याशी जोडला जातो. या निमित्ताने देशातील अनेक मंदिरांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा शाळिग्रामाला पालखीत विराजमान करून पूजा करतात. ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते. भगवान विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी आणि या धार्मिक उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी असते.
पंचांग मंगळवारचा शुभ मुहूर्त मंगळवारचा अशुभ मुहूर्त (आचार्य कृष्णदत्त)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.