बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






क्रिकेट विश्वात हिंदुस्थानच्या नावाचा दबदबा आणखी मजबूत झाला आहे. जपानविरुद्धचा ऐतिहासिक टी20 सामना हिंदुस्थानने जिंकला. टीम इंडियाचा हा विजय सर्वसामान्य नसून विश्व विक्रमी ठरला आहे. कारण, या विजयासह टीम इंडियाचा पुरुष संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 200 सामने जिंकणारा पहिला देश बनला आहे.


जपानविरुद्धचा सामना पावसाच्या व्यत्यायामुळे 20 षटकांचा होऊ शकला नाही. 5-5 षटकांचा सामना खेळवला गेला आणि टीम इंडियाने 2 धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाचा हा विजय टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 200 वा विजय ठरला. विशेष म्हणजे टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील पहिला, 50वा, 100वा, 150वा आणि आता 200 वा सामना जिंकत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अशी कामगिरी करणारा हिंदुस्थान जगातला पहिलाच देश ठरला आहे.


टीम इंडियाच्या पहिल्या टी20 पासून ते 200व्या टी20 सामन्या पर्यंतच्या प्रवासावर नजर मारल्यास टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 1 डिसेंबर 2006 रोजी टीम इंडियाने आपला पहिला टी20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि हा सामना 6 विकेटने जिंकला. त्यानंतर 2017 साली 50 वा श्रीलंकेविरुद्ध, 2022 साली 100वा वेस्टइंडिजविरुद्ध, 2024 साली 150वा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि आता 2026 साली 200वा जपानविरुद्ध जिंकला आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.