तेहरान: इराण आणि अमेरिका या दोन देशात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेले. सध्यातरी अमेरिका आणि इराण या दोन देशात युद्धबंदी पाहायला मिळतं आहे. सध्या तरी या दोन देशात शांतता पाहायला मिळत असली तरी, पुन्हा कधी संघर्ष पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. अमेरिकेच्या अटी इराणला मान्य नाही आहे. मात्र यासगळ्यात इराणमध्ये एक घटना घडली आहे. या घटनेन संपूर्ण इराणमध्ये खळबळ उडाली आहे. नक्की काय घडत आहे? याची कोणाला कल्पना नाही. इराणच्या आकाशात काही तरी चमकणारी वस्तू पाहायला मिळाली. हे नक्की UFO आहे की ड्रोन किंवा आणखी काही? याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. अमेरिकेच्या ब्लॅक मँटाबद्दल आता अटकळ बांधली जात आहे.




इराणमध्ये कुठे दिसली रहस्यमय वस्तू ?ही रहस्यमय वस्तू इराण वरती घिरट्या घालताना पाहायला मिळाली. सुरुवातीला २० सप्टेंबरला ही वस्तू पाहायला मिळाली. तेहरानमधील आझादेगान द्रुतगती महामार्गावर ही आकाशात तरंगताना पाहायला मिळाली. त्यानंतर २१ सप्टेंबरला झाहेदानमधील आकाशात अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला. हे दिसताना बहुरंगी दीवे असल्यासारखं दिसतात, तर अर्धचंद्राकृती विमान दिसत आहे, असा भास होतो.







इराणने यावर बाळगलं मौनअनेक जण या बद्दल वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. इराण वरती हेरगिरी करण्यासाठी हे केलं जात आहे का? अशी अनेकांना शंका आहे. काहींना वाटत आहे की हा एक प्रकाश असलेला पतंग आहे. एक रहस्यमय ड्रोन किंवा परग्रहावरील एखादी वस्तू पण असू शकते असं अनेकांना वाटतं. मात्र इराणच्या हवाई हद्दीत हे फिरत आहे त्यामुळे इराणकडून याबद्दल काहीतरी स्पष्टीकरण येईल. असं वाटत असताना दुसरीकडे मात्र इराण यावर काहीच बोलायला तयार नाही. यावर इराणने आपल मौन बाळगलं आहे.




आता पर्यंत ब्लॅक मँटा याबद्दल जास्त काही वस्तुनिष्ठ मिळू शकलं नाही. त्रिकोणी आकाराची वस्तू आणि विमान असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत १५० अभ्यास अहवाल यावर तयार आहेत मात्र ठोस असं काही नाही. इराण मध्ये UFO दिसल होतं. हे आकाशात चमकत असल्याने इराण ने एफ ४ ही लढाऊ विमाने पाठवली होती. मात्र त्यांना त्यामध्ये काही आढळून आलं नाही. दिसणाऱ्या वस्तूमधून काहीतरी गोल वस्तू बाहेर पडत होत्या आणि त्या विमानाच्या भोवती होत्या असं सांगितलं जातं. मात्र ती अजून पर्यंत लोककथाचं बनून राहिली आहे.




अमेरिकेचं ब्लॅक मँटा विमान असेल तरअमेरिका गुप्त विमानांच्या माध्यमातून आपल्यावर नजर ठेवते असा इराणला संशय होता. त्यामुळे त्यांनी १९७६ मध्ये लढाऊ विमाने पाठवली होती. मात्र इतिहासात असं काही होतं हे पुरावे अजून मिळाले नाहीत. किंवा इतिहासात ब्लॅक मँटा हे विमान अजून पर्यंत गूढ बनून राहील आहे. इराणमध्ये पण अलिकडे ज्या वस्तूचं दर्शन झालं ती वस्तू नक्की ड्रोन आहे की? विमान हे कळू शकल नाही. जर ब्लॅक मँटा असेल तर इराण काय पाऊल उचलणार हे बघणे महत्वाचं आहे.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.