Maharashtra Group C Combined Prelims Exam 2026 Talathi Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या भरतीसाठी राज्यभरातून विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा गट-क भरतीद्वारेच तलाठी पदांचीही भरती होणार असल्याने अर्जांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सुरुवातीला ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार होती; परंतु प्रशासकीय कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा २०२७ मध्ये होणार आहे.
च्या 'गट-क' मधील एकूण ५ हजार ७०७ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीच्या पूर्व परीक्षेसाठी राज्यभरातून १० लाख ८६ हजार ५३८ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या एका अर्जातून ही आकडेवारी समोर आली आहे. यानुसार एका जागेसाठी तब्बल १९० उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची संख्या सातत्याने वाढत आहे; सरकारी नोकरी मिळवण्याची तीव्र इच्छा हे यामागील मुख्य कारण मानले जात आहे. यंदा गट-क भरतीमध्ये तलाठी पदांचाही समावेश असल्याने जिल्हास्तरावर तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.
MPSC Group C Prelims Date: परीक्षेची नवीन तारीखदरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेच्या आयोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित असलेली ही पूर्व परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून, ती ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. याबाबतचे अधिकृत शुद्धीपत्रक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केले आहे. परीक्षेची तारीख पुढे गेल्यामुळे विशेषतः तलाठी पदाची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
MPSC Group C Bharti 2026 Vacancies: भरतीतील प्रमुख १० पदे१. लिपिक-टंकलेखक (मंत्रालयीन विभाग व राज्य शासनाची इतर कार्यालये): १,८६४ पदे
२. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग): १,५३९ पदे
३. लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग): ४८० पदे
४. सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क (गृह विभाग): ४६१ पदे
५. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३९ पदे
६. कर सहायक (वित्त विभाग): २८२ पदे
७. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे
८. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय: २३० पदे
९. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग: १५५ पदे
१०. आदिवासी विकास विभाग: ६९ पदे
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.