सुर्योदय आणि चंद्रोदय श्री गणेश एकाक्षर मंत्र महिमागणेश पुराणानुसार ब्रह्मदेव हे महर्षी व्यासांना सांगतात की, ‘हे वत्सा, श्री गणेश ही आद्य देवता असून, त्याला सर्व देवदेवतांमध्ये प्रथम पूजनाचा मान आहे. श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी, ह्यासाठी त्याची भक्ती, उपासना करण्यासाठी अनेक मंत्र आहेत. त्या अनेक मंत्रांपैकी एक एकाक्षरी अन् दुसरा षडाक्षरी असे दोन अतिमहत्त्वाचे, शीघ्र फल देणारे आणि महत्त्वाचे असे मंत्र आहेत. श्री गणेश या देवतेचा ॐ गं ॐ हा एकाक्षरी मंत्र आहे. तर श्री गणेशाचा दुसरा षडाक्षरी मंत्र म्हणजे ॐ वक्रतुंडाय हुं ॐ. या दोन मंत्रांपैकी ज्याला जो आवडेल त्या कोणत्याही मंत्राच्या जपसाधनेने गणेशभक्तांना त्या सुखकर्ता, दुःखहर्ता असा जो देव त्याची कृपा प्राप्त करून घेता येते.




या मंत्राची उपासना भक्तांनी कशाप्रकारे करावी यासंदर्भातील काही नियम, आचार, पद्धत गणेश पुराणात सांगितलेल्या आहेत.





  • श्री गणेश उपासना करण्यासाठी भक्ताने शांत आणि प्रसन्न ठिकाणी आपली बैठक मांडावी.

  • जो भक्त ही मंत्रोपासना करणार आहे त्याने सर्व प्रातर्विधी उरकून अभ्यंग स्नान करून देहशुद्धी करावी.

  • धूतवस्त्र अथवा सोवळे नेतृत कपाळी गंधा लावून शांत, प्रसन्न, एकाग्र चित्त मनाने जे आसन मांडले आहे, त्यावर येऊन बसावे.

  • नंतर शास्त्रोक्त पद्धतीने आचमन, प्राणायाम, न्यास करून सिद्ध व्हावे, मग हातावर पाणी घेऊन ऋतुकाल, वार, वेळ, तिथी, नक्षत्र यांचा उच्चार करून श्री गणेश सिद्ध मंत्र जपाचा संकल्प सोडावा.

  • आपल्या मनातील हेतूही गजाननास कथन करावा.

  • त्यानंतर मांडी घालून, डोळे मिटून ओंकार लावावा.

  • मनोमन श्री गणेशाचे ध्यान आठवून त्याचे चरणापासून ते मस्तकापर्यंत दिव्य रूप डोळ्यांसमोर आणावे.

  • मग गजानानची मूर्ती मनोमन न्याहाळत त्याचे मानस पूजन करावे.

  • कृपाप्राप्तीचे वरदान मागावे.

श्री गणेशास नम्र प्रार्थना करावी की, "हे विघ्नहर्त्या, श्री गणराया मी तुझ्या कृपाप्रसादासाठी यथाशक्ती, यथामती तुझी नाम जप उपासना करतो आहे. ही सेवा कोणत्याही अडीअडचणी न येता तूच पूर्ण करून घे." त्यानंतर निश्चित केलेली जपसंख्या ही तो सिद्ध म्हणून पूर्व करावी. मंत्र मुखाने म्हणावा. कानांनी तो ऐकावा आणि हृदयात त्याचे, मंगल रूपाचे ध्यान चिंतावे.




ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले की, "या सिद्धमंत्राचा जप एवढ्यासाठी करायचा असतो की, त्या मंत्रसाधनेने प्रसन्न झालेल्या श्री गणेशाच्या कृपेने उपासकाच्या पापांचा क्षय होतो. पुण्याची शिदोरी वाढते. ईप्सित कार्य निर्विघ्न पूर्ण होते. ही मंत्र उपासना सुयोग्य पद्धतीने आणि परिपूर्ण झाली असता उपासकास मंत्रसिद्धीचा लाभ, लक्ष्मी, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य ह्या गोष्टी प्राप्त होतात. भक्ताचे दुःख, दारिद्र्य, चिंता, भवदुःख, नैराश्य ह्या गोष्टी दूर होतात. तेव्हा हे वत्सा, तुझ्या मनात जी पुराण रचनेची इच्छा आहे, ती पूर्ण होण्यासाठी तू ह्या श्री गणेशाचीच उपासना कर. कार्यसिद्धीसाठी या मंत्राचा (एकाक्षरी) अवश्य जप करा असे गणेश पुराणातील उपासना खंडात अध्याय ११ मध्ये सांगितलेले आहे.




पंचांग बुधवारचा शुभ मुहूर्त बुधवारचा अशुभ मुहूर्त (आचार्य कृष्णदत्त)

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.