सुशील राऊत, ​छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातून नागरिक आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांमध्ये अपहरणाचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टीव्ही सेंटर, बजाजनगर, मुकुंदवाडी, तिसगाव आणि उस्मानपुरा या वेगवेगळ्या भागांतून तरुणी, विवाहिता, लहान मुले आणि तरुण अचानक गायब झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.




​टीव्ही सेंटरमधून १९ वर्षीय तरुणी गायबसिडको परिसरातील टीव्ही सेंटर, जिजाऊ चौक येथून 21 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास 19 वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून तिच्या आईच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.




​दोन चिमुकल्या मुलांसह विवाहिता बेपत्तारेल्वे स्टेशन परिसरातील गल्ली क्रमांक 5 येथून 22 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ज्योती तुषार किर्तीकर (वय 28) या घरातील कोणालाही न सांगता निघून गेल्या. त्यांच्यासोबत त्यांची विराट (वय 8) आणि विराज (वय 3) ही दोन लहान मुले देखील आहेत. नातेवाईकांकडे शोध घेऊनही त्यांचा पत्ता न लागल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांना डांबून ठेवल्याच्या संशयावरून सातारा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.




बजाजनगर येथून विवाहितेचे अपहरणबजाजनगर परिसरातील चिंचबन कॉलनी येथून २२ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक विवाहित महिला घरातून अचानक बेपत्ता झाली. पती सुहास प्रजापती कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांत अज्ञाताविरुद्ध अपहरणाची नोंद करण्यात आली आहे.




​तिसगाव येथून अल्पवयीन मुलगी गायब येथून तिसगाव येथे काकांकडे आलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीची अल्पवयीन मुलगी 21 सप्टेंबर रोजी रात्री घरात सर्वजण झोपलेले असताना अचानक गायब झाली. शोध घेऊनही ती न सापडल्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




​संजयनगर येथून 20 वर्षीय तरुणी बेपत्तामुकुंदवाडी परिसरातील संजयनगर गल्ली क्रमांक 13 येथून 12 सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास 20 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली. आई उषा लांडगे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.




​उस्मानपुरा येथून पान सेंटरवरील तरुण गायबधाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील रहिवासी असलेला पवन प्रेमनाथ मोरे (वय 26) हा तरुण उस्मानपुरा येथील गुरुद्वाराजवळील पान सेंटरवरून 20 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतरही तो न मिळाल्याने बहिणीच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​शहर आणि ग्रामीण भागातून एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलीस या सर्व प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.