Arthik Rashi Bhavishya 25 September 2026: शुक्रवारी अनंत चतुर्दशी असून पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाची पाठवणी करण्यात येणार आहे. गणरायाचा आशीर्वाद सर्व भक्तांवर कायम राहो.आज शुक्र ग्रह मुळ त्रिकोणराशी तुळामध्ये असणार आहे त्यामुळे मालव्य राजयोग तर बुध तुळ राशीत प्रवेश करत असून तिथे आधीपासूनच विराजमान असणाऱ्या शुक्र सोबत युती केल्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. तेव्हा मेषसाठी मेहनतीला यश, सिंह राशीने नवीन कामाला सुरू करावी, तर मीनसाठी धनलाभ असला तरी काही बाबतीत टेन्शन वाढणार आहे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी शुक्रवार कसा असेल, आर्थिक कुंडली काय सांगते, सविस्तरपणे जाणून घेऊया. मेष राशीच्या लोकांना शुक्रवारी खूप मेहनत करावी लागणार आहे. कामाच्या गडबडीमुळे घरात लक्ष थोडे कमी होईल. कामावर पूर्ण फोकस ठेवा. धावपळ जास्त आहे पण तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. राजकारणातील ओळखींमुळे तुमची कामे पटापट मार्गी लागतील.मिळकत वाढवण्यासाठी जे प्रयत्न करत आहात, त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये काम जरा जास्त असेल. सगळं काही छान सुरू असताना कोणत्याही वादात पडणे महागात पडेल त्यामुळे वादविवादापासून दूर राहा आणि बोलण्यावर कंट्रोल करा चंद्राचा सप्तम प्रभाव आणि प्रथम स्थानात सिंहराशीत केतू सिद्धिकारक आहे. त्यामुळे जे काम हाती घेणार ते व्यवस्थित पूर्ण होण्याचा योग आहे. ऑफिसमधील सहकारी किंवा घरातील काही सदस्यांमुळे ताण वाढू शकतो. एखाद्या नवीन कामाची सुरुवात नक्की करू शकता. घरात सुख-सुविधांच्या वस्तू वाढल्यामुळे रिलॅक्स फिल कराल. आर्थिक व्यवहार करताना मात्र सावध राहा, कागदपत्रे पुन्हा पुन्हा वाचूनच मग सही करा. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा आणि वेगावर नियंत्रण ठेवा. कन्या राशीपासून बाराव्या स्थानी केतू सप्तम राहू योग तयार करत आहे. त्यामुळे काही तरी वेगळं किंवा धाडसी करून दाखवण्याचा विचार तुम्ही कराल. ऑफिस किंवा व्यवसायात काहीतरी वेगळं किंवा हटके काम कराल. सासरच्या लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सकारात्मक असून त्यात नक्की यश मिळेल. लोकांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागा, तुमचा मान-सन्मान वाढेल. सर्व काही सुरळीत सुरू असताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शुक्रवारी पंचम स्थानातील चंद्र आणि एकादश स्थानात केतू यामुळे पुरूषार्थ आणि पराक्रमात वाढ होणार आहे. आर्थिक प्रयत्नांना यश मिळेल पण आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. सासरकडून लाभाचे योग आहेत. वादविवाद आणि घाईगडबडीपासून लांब राहा. हाती घेतलेला प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण करणार आहात. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत, त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. सगळं काही चांगलं होत असताना तब्येतीची काळजी घ्या आणि जंक फूड खाणे कमी करून सकस आहार घ्या. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ स्थिर स्थितीत नवम स्थानात असल्यामुळे आजार आणि कर्ज यातून मुक्ती मिळेल. विरोधक पुन्हा सक्रिय होत आहेत, त्यांच्यावर योग्य रणनीती आखून मात करा. कामाचा वेग वाढवा म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल आणि ग्राहकांची संख्या देखील वाढेल. शुक्रवारी अनावश्यक खर्च होणार आहेत तेव्हा स्वतःवर ताबा ठेवा आणि बजेट बिघडू देऊ नका. धनु राशीचा स्वामी गुरू कर्क राशीत मार्गी असल्यामुळे सावध राहायला हवे. तुमचे काम शांतपणे करा आणि कामातील फोकस वाढवा. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि वागण्यातील संयम कायम ठेवायला हवा. काही बाबतीत ताण येऊ शकतो, पण जास्त विचार करणे सोडून द्या. आर्थिक बाबतीत यश आहे दरम्यान गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.नवीन काही कोर्स करण्याचा ठरवले असेल तर तो सुरू करावा. मकर राशीवर तिसऱ्या स्थानातील शनी आणि सातव्या स्थानावर गुरूचा प्रभाव असेल. नवव्या स्थानातील केतूमुळे यामुळे हाती घेतलेले काम व्यवस्थित पूर्ण करणार आहात. नवीन प्रोजेक्ट मिळाला तर काम खूप असेल, पण घाबरू नका. प्रॉपर प्लॅनिंग करून काम केले तर मोठा फायदा होईल. कामात निष्काळजीपणा करू नका. नोकरीत असाल तर प्रमोशनचे योग आहेत. अचानक एखादे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. इतरांची साथ मिळवण्यात यश मिळेल. कुंभ राशीसाठी शुक्रवार सकारात्मक आहे. अचानक मित्रांची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा नक्की वाढेल.मिळकत आणि खर्च यांचा मेळ घाला. मीन राशीतील चंद्रामुळे प्रवासाचा योग आहे.आर्थिक बाबतीत सावध राहा. सरकारी कामे असतील तर ती आधी पूर्ण करून घ्या. राजकारणात असाल तर प्रयत्न यशस्वी होतील. खर्च करताना खिशाला जास्त कात्री लागणार नाही याची काळजी घ्या.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.