मुंबई: ' कौन बनेगा करोडपती १८ ' च्या विशेष सेलिब्रिटी एपिसोडमध्ये मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सहभागी झाले आहेत.निकम यांनी अजमल कसाबबाबत एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबनं अटकेनंतर चौकशीदरम्यान असा दावा केला होता की, तो अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आणि मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टी पाहण्यासाठी भारतात आला होता.




'कौन बनेगा करोडपती १८' च्या २५ सप्टेंबर रोजी प्रसारित झालेल्या विशेष भागामध्ये उज्ज्वल निकम यांच्यासह अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी सहभागी झाले होते. हे तिघेही '' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. या खेळादरम्यान त्यांनी १२.५ लाख रुपये जिंकले असून, ही रक्कम जळगाव इथल्या दृष्टीबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या 'मनोबल' या संस्थेला दान करण्यात आली आहे.



कसाबनं चौकशीदरम्यान रचला होता बनाव




शो दरम्यान यांच्याशी संवाद साधताना उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या खटल्यातील काही अत्यंत कठीण प्रसंगांना उजाळा दिला. निकम यांनी सांगितलं की, २६/११ च्या हल्ल्यानंतर अटकेत असताना कसाबनं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अनेक खोटे दावे केले होते.







कसाबनं असा दावा केला होता की, त्याला २६ नोव्हेंबरला नाही तर ६ नोव्हेंबरलाच अटक करण्यात आली होती. तसंच तो हिंदी चित्रपटांचा खूप मोठा चाहता असून अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला भेट देण्यासाठी मुंबईत आला होता, असंही त्यानं पोलिसांना सांगितलं होतं. इतकंच नाही तर त्याला भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'ने (RAW) पकडलं असल्याचा बनावही त्यानं रचला होता.






न्यायालयाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न




निकम यांनी पुढं सांगितलं की, कसाबनं खटल्यादरम्यान अनेक वेळा न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नाही तर कसाबनं आपण अल्पवयीन असल्याचाही दावा केला होता. मात्र, वैद्यकीय तपासणी करून तो सज्ञान असल्याचं न्यायालयात सिद्ध करण्यात आलं.




तुरुंगात अन्नातून विष दिलं जात असल्याचा आरोप कसाबन केला होता. प्रत्यक्षात अन्नात सापडलेली पांढरी पावडर ही तांदळाची पिठी होती, जी लॅब चाचणीनंतर स्पष्ट झाली,असा खुलासाही निकम यांनी केला.




निकम यांनी सांगितलं की, संपूर्ण खटल्याच्या शेवटी कसाबच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचे भाव दिसले होते आणि तीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरली.




शोदरम्यान राजकुमार राव यानंही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना स्पष्ट केलं की, अभिनयात येण्यापूर्वी तो दोन वेळा नॅशनल तायक्वांदो चॅम्पियन राहिला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.