भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IIT Madras Alumini Association च्या Sangam 2026 या कार्यक्रमात भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की भारताची आर्थिक वाढ 10 टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने करणे शक्य आहे. या भाषणादरम्यान त्यांनी देशात विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच विरोधकांवर टोला लगावण्याची संधीही सोडली नाही.
मंत्री सीतारामन यांचा नेमका मास्टरप्लॅन काय?केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या आर्थिक वाढीचा वेग 10 टक्क्यांपेक्षा जास्त करणे शक्य म्हणत त्यामागचा मास्टरप्लॅनही सांगितला आहे. जर देशात नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला, वाढले, शेतीकामात तंत्रज्ञानाचा वापर वाढला तर देशात उत्पादन वाढेल. सध्य स्थितीला तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ करून उत्पादन वाढवणे देशाला मोठे आर्थिक बळ देऊ शकते असे मंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले.
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणले विशेष तंत्रज्ञानकेंद्रित अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यांनी या भाषणात POS मशीन आणि जमीन मोजण्यासाठी वापरात येणाऱ्या ड्रोन या दोन तांत्रिक उपकरणांचा विशेष उल्लेख केला. मुळात POS मशीन पिकासाठी लागणारे खताचे योग्य प्रमाण ठरवते जेणेकरून पिकाचा नाश होऊ नये व उत्पादन वाढावे. तर आधी हाताने मोजाव्या लागणाऱ्या शेतजमिनीची मोजणी करणे ड्रोन या उपकरणामुळे अधिक सोपे झाले आहे.
आर्थिक वाढीसाठी स्टार्टअप्स महत्वाचेकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणादरम्यान स्टार्टअप्सचा विशेष उल्लेख केला. 2015 नंतर देशातील स्टार्टअप इकोसिस्टममध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे त्यांनी प्रामुख्याने नमूद केले.
विरोधकांना लगावला टोला! रोजी आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिला तिमाहीतील GDP निकाल लागला. या निकालात एप्रिल ते जून महिन्यांची भारताची आर्थिक वाढ 7.6 टक्के दाखवण्यात आली. मुळात ही वाढ देशातील बहुतेक तज्ञ मंडळींच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती त्यामुळे काहीकाळ देशभरात आनंदाचे वातावरण राहिले. अशात देशाचे माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सरकारने गेल्या वर्षीच्या आकड्यांमध्ये बदल केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते यंदाचे आकडे मोठे दिसावे म्हणून सरकारने गेल्या वर्षीच्या आकड्यात बदल केला. परंतु पुढे सरकारने या दाव्याला चुकीचे म्हणत फेटाळून लावले. पुढे सुभाष चंद्र गर्ग यांचा मुद्दा देशातील विरोधी पक्षांनी पकडून ठेवला. आजच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावल्याचे चित्र आहे. या भाषणात त्यांनी काही नकारात्मक लोकं असा उल्लेख करत भारत अपयशी ठरल्यावर त्यांना फार मज्जा येते असे विधान केले आहे. तसेच त्यांना सकारात्मक विचार करण्याचा संदेश दिला आहे.