राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अदिती पोहरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी याबात स्पष्ट संकेत दिले आहेत. अदिती पोहरे या देशोन्नती वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. अदिती पोहरे यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करताच यशोमती ठाकूर यांनी आदिती पोहेरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
प्रा. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. या शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी आता काँग्रेसच्या वतीने अदिती पोहरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. आदिती पोहोरे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.
महायुतीमध्ये रस्सीखेच
दरम्यान दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे मात्र पुण्याच्या पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर शिक्षक मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना शिंदे गट पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छूक आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही मतदारसंघावर दावा केला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.