मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी शनिवार हा ब्लॉकबस्टर आणि ऐतिहासिक दिवस असणार आहे. कारण एकाच दिवशी भारताचे एक दोन नाहीतर तीन सामने असणार आहेत. पहिला सामना महामुकाबला असणार भारत वि. पाकिस्तानमध्ये असणार आहे. त्यासोबतच रो-कोही मैदानात दिसतील. तिसरा सामना हा आंतरराष्ट्रीय असणार नाही. भारताचे जुने शिलेदार वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स इंडिया चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स आमनेसामने येतील. हे तिन्ही सामने किती वाजता असणार आहेत जाणून घ्या.




भारत वि. पाकिस्तान, पहिला सामना (सकाळी १० वाजता) संघाचा पहिला सामना सकाळी १० वाजता असणार आहे. क्रिकेटमधील फायनल सामना सुवर्णपदकासाठी भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे. या हाय-व्होल्टेज पुरुष टी-२० सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. भारताचा बेबी बॉस वैभव सूर्यवंशीला खेळवणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग दुसरे आशियाई सुवर्ण जिंकण्याच्या इराद्याने उतरेल.




भारत वि. वेस्ट इंडिज, दुसरा वनडे सामना (दुपारी २ वाजता)पहिला सामना पार पडल्यावर भारतीय संघाचा दुसरा सामना हा वनडे असणार असून वेस्ट इंडिजविरूद्ध पार पडणार आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दिसतील. मोहाली येथे शेवटचा वनडे सामना होणार असून अंतिम सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने उतरेल. तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघात अंतिम ११ मध्ये बदल पाहायला मिळतील.




वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स)दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांशिवाय, माजी दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२६चा देखील उद्यापासून दिमाखात प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या म्हणजेच पहिल्या सामन्यात दुपारी ५:०० वाजता शारजाह क्रिकेट स्टेडियमवर युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यात अत्यंत रंजक लढत होणार आहे. रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, युसूफ पठाण, सुरेश रैना, शिखर धवन, हरभजन सिंग मैदानात दिसणार आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.