मुंबई : तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने भारताचा ५ विकेटने पराभव केला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये ३५१-७ धावा केल्या होत्या. शे होपच्या नाबाद १६२ धावांच्या शतकी खेळीसमोर भारताच्या गोलंदाजांनी गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. वेस्ट इंडिजने धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताडून के.एल. राहुलने नाबाद १२९ धावा, रोहित शर्माने ९२ धावा केल्या होत्या. मात्र भारतीय गोलंदाजांना ३५० धावांचा बचाव करण्यात अपयश आले. वेस्ट इंडिज संघाने तिसरा सामना जिंकत मालिकेचा गोड शेवट केला.




पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीवीर (१) आणि विराट कोहली (०) झटपट आऊट झाल्यामुळे भारताची अवस्छान ४-२ अशी झाली होती. पण त्यानंतर रोहित शर्माने ८५ चेंडूंत ९२ धावांची (१० चौकार, ३ षटकार) खेळी केली. त्याला ऋतुराज गायकवाडने ५७ धावा करत साथ दिली. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या के. एल. राहुलने ८७ चेंडूंत नाबाद १२९ धावांची (१० चौकार, ६ षटकार) कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली. मिडल ऑर्डरला नमन धीरने ३० धावा करत ५० ओव्हरमध्ये ३५१ धावांचा डोंगर उभारला आहे.




भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचीही सुरूवात खराब झाली होती. शतकवीर जॉन कॅम्पबेल अवघ्या १० धावा करून माघारी परतला. मोहम्मद सिराजने त्याला आऊट केले. मात्र त्यानंतर कर्णधार शे होपने १४३ चेंडूंत १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १६२ धावा केल्या. अमिर जांगू याला आज आणखीन प्रमोश मिळाले, दुसऱ्या विकेटसाठी शे होपसोबत त्याने १०९ धावांची भागीदारी करत सामन्यावर पकड मिळवायला सुरूवात केली. एका चुकीच्या कॉलमुळे जांगू रनआऊट (६७ धावा) झाला होता. कीमो पॉलने ३५ चेंडूंत ४४ धावांची धडाकेबाज खेळी केली त्यासोबतच शेरफेन रदरफोर्ड २४ धावा आणि मॅथ्यू फोर्ड ७ धावा करून आऊट झाले. पण या विकेटचा दबाव सामन्यावर पडला नाही. कारण शे होपने एक बाजून लावून धरली होती. पायाला पेटके आले पण तो मागे हटला नाही, शेवटपर्यंत मैदानावर उभा राहला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.







दरम्यान, या सामन्यात अंशुल कंबोज याने वनडेमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला काही खास कामगिरी करता आलीन नाही. या संपूर्ण मालिकेत भारताची गोलंदाजी खराब राहिली हे मान्य करावं लागेल. पहिल्या सामन्यात कुलदीप यादवने करिष्मा दाखवला होता. आगामी वर्ल्ड कपच्या तयारीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाला काम करावं लागणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.