देशातील व्हॉईस AI तंत्रज्ञान आता प्रादेशिक भाषांमध्ये किती प्रगत झाले आहे, याचे थेट प्रात्यक्षिक इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये दिसले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विचारलेल्या मराठी प्रश्नांवर JioChat AI ने रिअल-टाइम उत्तर दिले. AI ची ही भाषिक समज आणि अचूकता पाहून रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानीही कौतुकाने पाहत राहिले.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी रिलायन्स जिओच्या स्टॉलला भेट दिली असता, त्यांनी जिओच्या नव्या 'JioChat AI' शी थेट मराठीत संवाद साधत टाकलेली 'मराठी गुगली' आणि त्याला AI ने दिलेले रिअल-टाइम उत्तर पाहून शेजारी उभे असलेले रिलायन्स जिओचे प्रमुख आकाश अंबानी यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले.
शिंदे यांनी स्वतः या संवादाचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले, "ठीक आहे AI.. चला, आता मराठीतच बोलूया! आज IMC 2026 मध्ये JioChat AI शी मराठीत संवाद साधण्याचा अनुभव अत्यंत रंजक होता."
व्हिडिओमधील मराठी संवादजिओच्या Voice AI सिस्टिमची टेस्ट घेण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांनी अचानक मराठीत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील संपूर्ण संवाद खालीलप्रमाणे झाला.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे: "मला सांगा, मी आता यशोभूमीमध्ये आहे. किती वेळ लागणार मला घरी जायला? सफदरजंग रोडला जायला किती वेळ लागणार मला?"
JioChat AI (अत्यंत अचूक आणि स्पष्ट मराठी आवाजात): "यशोभूमीहून सफदरजंग रोडला जायला तुम्हाला साधारण 1 तास आणि 45 मिनिटं लागू शकतात."
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे: "बरं आता तुमचा मेट्रोचा लवकर कनेक्शन घ्यायचा नाव काय?"
JioChat AI: "यशोभूमी द्वारका सेक्टर 25 स्टेशन..."
हा अत्यंत अचूक, रिअल-टाइम आणि स्थानिक वाहतुकीचा संदर्भ लक्षात घेऊन दिलेला डेटा ऐकून तिथे उपस्थित असलेले आकाश अंबानी AI च्या या टेक्निकल क्षमतेचे कौतुक करत राहिले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.