मुंबई : मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाला. पण टी-२० सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक महाविक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी केलेली धावसंख्या मिळवून एकूण ५०१ धावा झाल्या. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात तब्बल १७ वर्षांनंतर (२००९ नंतर) पहिल्यांदाच एकाच सामन्यात ५०० पार धावांचा टप्पा ओलांडला गेला असून, या धावांच्या महापुरात वेस्ट इंडिजने भारतावर ६ गडी राखून थरारक विजय मिळवला.




मैदानावरील हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा, तर गोलंदाजांसाठी एका वाईट स्वप्नासारखा ठरला. टॉस हरल्यामुळे भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २४९-५ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून सलामीवीर ४१ चेंडूंत ८२ धावांची वादळी खेळी केली, तर ईशान किशन (४३) आणि तिलक वर्मा (४४) यांनी त्याला तोडीस तोड साथ दिली. पण भारताने रचलेल्या धावसंख्येचा कॅरेबियन संघाने यशस्वीपणे पाठलाग केला.




भारताने दिलेल्या २५० धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी ऐतिहासिक विक्रम रचला. या सामन्यात मयंक यादवने सुरुवातीला २ विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने अवघ्या ४५ चेंडूंत ९ षटकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. वेस्ट इंडिजकडून सर्वात वेगवान शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याला शेर्फेन रदरफोर्डने ३७ चेंडूत ८४ धावांची खेळी करत मोलाची साथ दिली. अखेर रोमारिओ शेफर्डने १३ चेंडूंत नाबाद ३४ धावा केल्या. कॅप्टनने शेवटला विजयी षटकार मारत शतक पूर्ण केले. त्यासोबतच वेस्ट इंडिजला १८.३ ओव्हरमध्ये २५२-४ धावांवर पोहोचवले आणि सामना खिशात घातला.




या सामन्यात झालेल्या ५०१ धावा या आंतरराष्ट्रीय पुरुष टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च एकत्रित धावा ठरल्या आहेत. यापूर्वी २००९ मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर्वाधिक ५१७ धावांचा विक्रम नोंदवला गेला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०२६ मध्ये हा पराक्रम पुन्हा घडला आहे, ज्यामुळे हा सामना टी-२० इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक म्हणून नोंद झाली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.