मुंबई : वेस्ट इंडिज संघाने भारताचा २४ धावांनी पराभव करत सामना जिंकला. या विजयासह मालिकेत २-२ने बरोबकी साधली आहे. पण या सामन्यात दुर्दैवी घटना घडली. भारतीय संघ ऑल आऊट नव्हता झालेला पण कॅप्टन श्रेयस अय्यर याने शेवटची विकेट राहिली होती तरीसुद्धा श्रेयसला निर्णय घ्यावा लागला. कारण भारताचा स्टार खेळाडू अर्शदीर सिंह जखमी झाला. आग ओकणारा चेंडू अर्शदीपकडून टोलवताना मिस झाला आणि त्याच्या खांद्यावर बसला. तरीपण तो उभा राहिला पण तरीही शेवटी त्याला मैदान सोडावं लागलं.




नेमकं काय घडलं? शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय संघ ऑल आऊट झाला नसतानाही भारताचा डाव १९.३ ओव्हरमध्येच संपुष्टात आला. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी २५ धावांची गरज असताना वेस्ट इंडिजचा गोलंदाज शमार जोसेफ गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरमधील एका वेगवान आणि उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अर्शदीप सिंगच्या खांद्याला आणि हाताला चेंडू अतिशय वेगाने येऊन लागला. चेंडू लागताच अर्शदीप तीव्र वेदनेने विव्हळत खेळपट्टीवरच खाली बसला. भारतीय संघाच्या फिजिओनी मैदानावर धाव घेत त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र अर्शदीपला साधी बॅट पकडणेही असह्य झाले होते.




विजयाचे अंतर जास्त होते आणि भारताकडे केवळ एकच विकेट शिल्लक होती. अशा परिस्थितीत शेवटच्या तीन चेंडूंसाठी भारताच्या मुख्य गोलंदाजाची दुखापत अधिक वाढवणे धोक्याचे ठरू शकले असते. हेच ओळखून कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघ व्यवस्थापनाने अत्यंत समजूतदारपणे निर्णय घेत १९.३ ओव्हर झाल्या असताना अर्शदीप सिंगला तातडीने मैदानाबाहेर बोलावले. अर्शदीप फलंदाजीस असमर्थ ठरल्याने त्याला नियमानुसार 'रिटायर्ड आऊट' घोषित करण्यात आले आणि भारताचा डाव ९ बाद २२३ धावांवर संपला.




दरम्यान, कर्णधार अय्यरचा हा निर्णय अर्शदीपच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण ५ सामन्यांची ही मालिका आता २-२ अशा रोमांचक स्थितीत आली आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या अंतिम निर्णायक सामन्यासाठी अर्शदीपचे तंदुरुस्त राहणे भारतीय संघासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे याचा बदला अर्शदीप सिंह नक्कीच घेईल. कारण चेंडू लागल्यावरही जोसेफने पूढचा चेंडू विकेटमध्ये न टाकता त्याला फॉलो करत त्याच्या अंगावर टाकला. तो चेंडू कीपरलाही अडवता आला नाही. वाईड तर होताच आणि चौकारही गेला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.