देशातल्या सगळ्यात मोठ्या बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR व्याजदरात वाढ केली आहे. MCLR म्हणजे Margine Cost Of Funds Based Lending Rate. भारतीय स्टेट बँकेने या व्याजदरात 0.15 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे एखाद्या कर्जदाराने SBI बँकेतून घेतलेले कर्ज जर MCLR शी जोडलेले असेल तर संबंधित कर्जाचे व्याजदर वाढू शकते. SBI चे हे नवे वाढीव MCLR व्याजदर 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहे.
कोणकोणत्या कालावधीसाठी वाढवण्यात आले व्याजदर?MCLR चा कालावधी एका दिवसाचा असल्यास व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. विशेष म्हणजे एका महिन्याच्या कालावधीसाठी देखील व्याजदरात बदल नाही. जर MCLR चा कालावधी 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर व्याजदरात 0.15 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
कोणकोणत्या ग्राहकांना वाढीव व्याजदराचा फटका बसेल?जर एखाद्या कर्जदाराने SBI बँकेतून घेतलेले MCLR शी जोडलेले असेल तर त्या कर्जदाराला वाढीव व्याजदराचा फटका बसेल. एकंदरित MCLR शी जोडलेले फ्लोटिंग रेट कर्ज, MCLR शी जोडलेले होम लोन तसेच ऑटो लोनच्या व्याजदरावर परिणाम होऊ शकतो. जर कर्ज EBLR किंवा RLLR शी जोडलेले असेल तर MCLR व्याजदरवाढीचा थेट परिणाम जाणवणार नाही.
MCLR शी जोडलेल्या EMI चे काय होईल?जर कर्जदाराने घेतलेले कर्ज MCLR शी संबंधित असेल तर संबंधित EMI वर परिणाम होऊ शकतो. एक तर कर्जदाराला आधीच्या मासिक रकमेच्या तुलनेने महिन्याला अधिकचे पैसे मोजावे लागतील अन्यथा EMI च्या कालावधीत वाढ होईल. लक्षात घेण्याची महत्वाची बाब म्हणजे MCLR शी जोडलेल्या प्रत्येक EMI वर याचा परिणाम ताबडतोब जाणवणार नाही. काही कर्जांचे वार्षिक व्याजदर एका विशिष्ट कालावधीसाठी आधीच ठरवली आहे. त्यामुळे तो विशिष्ट कालावधी पूर्ण होईपर्यंत SBI चे नवे वाढीव MCLR व्याजदर लागू होणार नाही. विशेष म्हणजे SBI ने MCLR व्याजदरात केलेली वाढ कायमस्वरूपी नसून एका विशिष्ट कालावधीसाठी आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच वाढवले व्याजदर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने Repo Rate मध्ये 25 बेसिस पॉईंट्सची वाढ करत नवा दर 5.50% निश्चित केला. RBI ने व्याजदर वाढ केल्यामुळे देशातील बँकिंग संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळणारे कर्ज आधीच्या तुलनेने महाग पडू लागले आहे. त्यामुळे देशातील बहुतेक बँका व्याजदर वाढीच्या तयारीला लागल्या आहेत. अशात SBI ने MCLR संबंधित व्याजदरात 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे MCLR शी जोडलेले कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या खिशावरील भार आधीच्या तुलनेने अधिक वाढला आहे.
MCLR म्हणजे काय? म्हणजे Margine Cost Of Funds Based Lending Rate. MCLR म्हणजे बँकेचा निधी उभारण्याचा खर्च तसेच इतर घटक लक्षात घेऊन ठरवण्यात आलेला संदर्भ व्याजदर. विशेष म्हणजे या MCLR शी जोडलेल्या कर्जाचा व्याजदर एका ठराविक कालावधीनंतर बदलू शकतो.