मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजमधील पाचवा टी-२० सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामना सुरू होण्याआधीपासून पावसाने आपली बॅटिंग सुरू ठेवलीी होती, पण पावसाने काहीसा विसावा घेतल्यावर ९.१५ वाजता सामना ९ ओव्हरचा करण्यात आला होता. भारतीय संघ बॅटिंग उतरला आणि आक्रमक सुरूवात केली होती पण भारताच्या संपूर्ण ९ ओव्हरही खेळून झाल्या नाहीत तोवर पावसाने पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केले आणि सामना रद्द करावा लागला. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पठ्ठ्याने मैदान गाजवलं, कारण शंभर किंवा दोनशे नाहीतर ४००च्या स्ट्राईक रेटने त्याने कॅरेबियन गोलंदाजांची धुलाई केली. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
चिन्नास्वामी स्टेडियमवर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. सामना प्रत्येकी ९ ओव्हर्सचा करण्यात आला होता. वेस्ट इंडीजने टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी बोलावलं होतं. भारताची सुरुवात झंझावाती झाली. सलामीवीर संजू सॅमसनने ७ चेंडूत १६ धावा (२ चौकार, १ षटकार) तर अभिषेक शर्माने ४ चेंडूत ६ धावा केल्या. यानंतर आलेल्या इशान किशनने अवघ्या १० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३०० च्या स्ट्राईक रेटने ३० धावांची तुफानी खेळी केली. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ५ वा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला असला, तरी भारताच्या फलंदाजांनी आमंत्रित केले होते. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने १४ चेंडूत २२ धावा जोडल्या, तर तिलक वर्मा ७ धावांवर आऊट झाला. पण सामन्याचे खरे आकर्षण ठरला तो मुंबई इंडियन्सचा पठ्ठा नमन धीर.
मैदानात येताच वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली. नमन धीरने अवघ्या ६ चेंडूंमध्ये ३ खणखणीत षटकार आणि १ चौकार ठोकून नाबाद २४ धावा कुटल्या. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल ४०० चा होता. भारताचा डाव ७.४ ओव्हर्समध्ये ५ बाद ११८ धावांवर असताना पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. वेस्ट इंडीजकडून शमार स्प्रिंगर आणि कीमो पॉल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. सतत पडणाऱ्या पावसामुळे अखेर पंचांना हा सामना 'रद्द' घोषित करावा लागला. सामना रद्द झाल्यामुळे ५ सामन्यांची ही टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत शे होप याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग 11): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (WK), इशान किशन, श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग
वेस्ट इंडिज (प्लेइंग 11): शाई होप (C/WK), ज्वेल अँड्र्यू, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, शामर स्प्रिंगर, गुडाकेश मोती, शामर जोसेफ