दीपक पडकर, बारामती : पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, सध्या रा. भिगवण, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या हल्ल्यासाठी ज्ञानदेव शिंदे याने 2 लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.




बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पायलट ढाब्यासमोर पालखी महामार्गावर राणा सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र हल्ला केला होता. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.




दोन लाखांचा उलगडाया प्रकरणाचा तपास सुरू असताना पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ अवथळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ज्ञानदेव शिंदे याने हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.




हल्ल्यामागील कारण तपासातून समोर येणारतांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी पार्थ अवथळे आणि यांना २० ऑक्टोबर रोजी अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.




नेमकं प्रकरण काय?राणा सूर्यवंशी हे सोलापूरचे रहिवासी आहेत. त्यांची शिपिंग कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे महाराष्ट्रासह गोव्यात कार्यालय आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे शह आणि बारामतीत त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. राणा रविवारी बारामतीत गेले होते. राणा एक शेतजमीन पाहण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांचे या घटनेतील तक्रारदार लक्ष्मीकांत यांच्यासोबत बोलणं झालं होतं. ते बारामतीत पोहचले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत आणि त्यांच्या तीन मित्रांनी राणांच्या स्वागताची तयारी केली होती.




राणा सूर्यवंशी आपल्या ताफ्यासह बारामती परिसरात दाखल झाले होते. त्यांच्या ताफ्यात अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल देखील होते. ते बारामतीत आले तेव्हा दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी आपण तुमचे फॅन असून फोटो काढायची इच्छा व्यक्त केली. पण फोटो काढायच्या बहाण्याने एक आरोपी पुढे आला आणि त्याने पिस्तूल काढत राणा यांच्यावर रोखली. यावेळी त्याची पिस्तूल जाम झाली आणि ती निकामी झाली. त्यामुळे सुदैवाने राणा यांचा जीव बचावला. पण संकट अजून टळलेलं नव्हतं.




राणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हल्लेखार तरुणाच्या हातावर प्रहार केला. त्यामुळे ते पिस्तूल रस्त्यावर पडलं. यानंतर तरुणाने धारधार शस्त्र करुन राणा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राणा गंभीर जखमी झाले. यावेळी अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबलने पळून जाणाऱ्या पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका आरोपीला पकडलंदेखील पण त्याने त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे आरोपी त्यांच्या हातून निसटला. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन थेट शेतात पळाला. तर दुसरा आरोपी दुचाकीवरुन फरार झाला. यानंतर पोलिसांची विविध पथके तातडीने आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.