भाईंदर : सरकारी शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिला आणि तिच्या मैत्रिणीची 21 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक (Mira Bhayandar Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी 40 वर्षीय तुलसीदास जाधव याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोलापूर हून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव याने 2025 मध्ये संबंधित महिलेच्या (Mira Bhayandar Crime News) वडिलांशी संपर्क साधला होता. आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए असल्याचा दावा त्याने केला होता. तसेच, एका शिक्षक संघटनेशी संबंधित असून अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्याचेही त्याने सांगितल्याचा आरोप आहे.(Mira Bhayandar Crime News)
महिलेची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत जाधव याने संबंधित महिलेच्या वडिलांकडून 21 लाख 46 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, दोघींनाही नोकरी मिळाली नाही. तसेच, दिलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. या आरोपी विरोधात महाराष्ट्रात 11 ठिकाणी अशाच प्रकारे गुन्हे दाखल आहेत.(Mira Bhayandar Crime News)
पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण (डीसीपी झोन 1) यांनी माहिती देताना सांगितलं की, "मीरा भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ह्याच्यामध्ये फिर्यादी व त्यांची मैत्रीण यांना आरोपी तुलसीदास जाधव यांनी ते अजित दादा पवार यांचे पी.ए. असून ते शिक्षक संघाचे कार्यकर्ते आहेत, असा बहाणा केला आणि त्यांना विश्वास दिला की, तुम्हाला मी सरकारी नोकरी लावून देतो. असा बहाणा करून त्यांनी फिर्यादी व त्यांची मैत्रीण यांच्याकडून 21 लाख रुपये 2025 साली घेतले आणि त्यानंतर त्यांनी पैसे घेतल्यानंतर स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि त्यानंतर कोणताही संपर्कात नव्हते. हे जे फिर्यादी आहेत ते आत्ता आमच्याकडे आले आणि आम्ही भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये ह्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला आम्ही सोलापूर या ठिकाणाहून अटक केलेलं आहे आणि तपासामध्ये आम्हाला आणखीन एक विशेष बाब समोर आली, की जो आरोपी आहे तुलसीदास जाधव यांच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे आपले स्टेट लेव्हलचे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत, यांच्याबरोबरचे फोटो होते आणि अशाच प्रकारे हे आरोपी वरती महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी अजूनही खूप लोकांना फसवलेलं असू शकतं, तर आम्ही ह्याच्यामध्ये आमचा पुढील तपास चालू आहे आणि असे जे काही व्हिक्टिम्स असतील तर त्यांनी समोर येऊन भाइंदर पोलीस स्टेशनमध्ये ते त्यांचे जवाब जे आहेत ते देऊ शकतात."(Mira Bhayandar Crime News)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.