Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (100 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि लेखिका सई परांजपे (Sai Paranjpye) यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून (Maharashtra Sahitya Parishad) विचारणा करण्यात आली होती. पण, सई परांजपे यांनी अध्यक्षपदाला नकार कळवला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून त्यांना विनंती करण्यात आलेली. तसेच, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सई परांजपे भूषवणार, अशा चर्चांनाही उधाण आलेलं. पण, त्यांनी यासाठी नकार दिल्यामुळे आता अध्यक्षपदी कोण? हा प्रश्न कायम आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी सई परांजपे यांच्याशी संपर्क साधला होता आणि ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्षपद स्वीकारावं, अशी विनंती केली होती. मात्र, सई परांजपे यांनी त्यांना नकार कळवलाय.
ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला नकार का दिला?
ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला दिग्दर्शक, निर्मात्या आणि लेखिका सई परांजपे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. तसेच, नकारासाठी त्यांनी आपल्या तब्येतीचं कारण दिलंय, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांनी दिलीय.
यंदाचं साहित्य संमेलन शंभरावं असून ते नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे. मात्र, सई परांजपे यांना सुनील महाजन यांच्याकडून विचारणा करण्यात आलेली. मात्र, त्यांनी नकार कळवलाय. अशातच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची बैठक पुन्हा एकदा आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत आता ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष कोण असेल? हे ठरवलं जाणार आहे. दरम्यान, आता सई परांजपेंनी नकार कळवल्यामुळे आता शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सई परांजपे कोण?
सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव म्हणजे, सई परांजपे. आपल्या समांतर सिनेमांनी त्यांनी प्रेक्षकांना थिएटर्सकडे खेचून आणलं. कित्येक दर्जेदार सिनेमे देणाऱ्या सई परांजपे उत्तम दिग्दर्शक, निर्मात्या असण्यासोबतच लेखिकाही आहेत. सई परांजपे या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्य लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार आहेत. त्यांनी अनेक दर्जेदार बालनाट्यही लिहिलीत.
पाहा व्हिडीओ : 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, कारण काय?
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.