बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






भाईंदर पोलीस ठाणे आणि भाईंदर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल अज्ञात महिलेकडून पाठवण्यात आल्याने मीरा-भाईंदर परिसरात खळबळ उडाली. या धमकीची माहिती मिळताच मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाईंदर पोलीस ठाणे आणि रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बशोध मोहीम राबवण्यात आली.


पोलीस ठाणे आणि रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. बॉम्बशोधक, श्वानपथक आणि तपास पथकांच्या मदतीने संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक तपासणी करण्यात आली. मेटल डिटेक्टरसह विविध तपासणी उपकरणांच्या सहाय्याने पोलीस ठाणे आणि भाईंदर रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी केली. मात्र तपासणीत बॉम्ब आढळून आला नाही. असे असले तरी धमकी देणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. धमकीचा ई-मेल कोणी पाठवला याचा शोध सुरू असून लवकरच संबंधित महिलेला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.