स्वयंपाकासाठी ॲल्युमिनियमची भांडी वापरली जातात. ही भांडी स्वस्त आणि वापरण्यास सोपी असली, तरी आरोग्याच्या दृष्टीने ती घातक ठरू शकतात. ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये काही विशिष्ट पदार्थ शिजवल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आज आपण या भांड्यामध्ये कोणते पदार्थ शिजवू नयेत हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.


ॲल्युमिनियम लीचिंग


ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये आंबट किंवा जास्त खारट पदार्थ शिजवल्यास त्या धातूचे काही सूक्ष्म कण अन्नामध्ये मिसळतात. या प्रक्रियेला ॲल्युमिनियम लीचिंग म्हणतात. जरी याचे परिणाम लगेच दिसत नसले, तरी भविष्यात यामुळे किडनी, हाडे आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. यासाठी स्टेनलेस स्टील किंवा मातीच्या भांड्यांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.


ॲल्युमिनियमच्या भांड्यात कोणते पदार्थ शिजवू नयेत?


टोमॅटो आणि टोमॅटोचे पदार्थ – टोमॅटो आम्लधर्मी असतात. ॲल्युमिनियमच्या भांड्यात टोमॅटोची ग्रेव्ही किंवा सॉस बनवल्याने अन्नाची चव बिघडते आणि त्यामध्ये धातूचे प्रमाण वाढते.


लिंबूवर्गीय पदार्थ – लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळांमध्ये आम्ल असते. त्यांचा रस किंवा पदार्थ ॲल्युमिनियमच्या भांड्यात गरम केल्यास धातू अन्नात उतरतो.


व्हिनेगरयुक्त पदार्थ – व्हिनेगरची ॲल्युमिनियमसोबत वेगाने केमिकल रिऍक्शन होते, जे शरीरासाठी हानिकारक असते. अशा पदार्थांसाठी काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्यांचा वापर करावा.


चिंचेची चटणी – चिंचेतील आम्ल ॲल्युमिनियमसोबत प्रतिक्रिया करू शकते. त्यामुळे चिंचेची चटणी किंवा चिंच घातलेल्या भाज्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात जास्त वेळ ठेवू नयेत.


दही आणि दुग्धजन्य पदार्थ – दही, ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टिक ॲसिड असते. हे ॲसिड ॲल्युमिनियमसोबत रिऍक्शन करून विषारी द्रव्ये तयार करू शकते.


बटाटे – बटाट्यांमध्ये नैसर्गिक आम्ल असते, जे ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवल्यास आरोग्यावर परिणाम करू शकते. बटाटे शिजवण्यासाठी स्टेनलेस स्टील किंवा लोखंडी भांडी उत्तम मानली जातात.


त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वयंपाक करताना योग्य भांड्यांची निवड करणे गरजेचे आहे.


हेही वाचा – स्टीलची भांडी काळी पडलीत?



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.