Nana Patekar Nephew Sachin Patekar Emotional Post: सिनेसृष्टीचा 'नटसम्राट' आणि संवेदनशील अभिनेता नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं गोव्यातील (Goa News) त्यांच्या राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन (Nana Patekar Passes Away Following Heart Attack) झालं. नानांचं असं अचानक जाणं सर्वांच्याच मनाला चटका लावणारं ठरलंय. नानांच्या जाणानं मनोरंजन विश्वही हादरलं असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच, नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच, नानांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आणि अभिनेता सचिन पाटेकर यानं त्यांच्या पुण्यातल्या (Pune News) फार्महाऊसवर पार पडलेल्या कार्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


नाना पाटेकरांचं पुण्यातील डोणजे गावात आलिशान फार्म हाऊस आहे. टोलेजंग घर, आसपास शेती, एक मोठ्ठी विहीर आणि वाऱ्याव डोलणारी असंख्य झाडं, असं काहीसं वातावरण 'नानाची वाडी'मध्ये पाहायला मिळतं. पण, आता तिथे नाना मात्र भेटणार नाहीत. याच नानाच्या वाडीमध्ये शेतात नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नुकतंच नाना पाटेकर यांचं कार्य पार पडलं. त्यांच्या फार्म हाऊसमधील नानांच्या कार्याचा एक फोटो पोस्ट केलाय. तसेच, त्या फोटोसोबत नाना पाटेकरांनी एक भावूक कॅप्शनही लिहिलंय. नाना पाटेकरांनी लिहिलंय की, "या घरात या कार्यासाठी येईन, असं ध्यानी मनी न्हवतं... का रे काका असा वागलास, असा निघून गेलास... देवा तू इतका कसा निष्ठुर झालास रे". 





 


 

 



 

 


View this post on Instagram


 



 

 

 



 

 



 

 

 




 

 


A post shared by iamsachinpatekar (@actorsachinpatekar)







नाना पाटेकर यांचा पुतण्या अभिनेता सचिन पाटेकर यानं एक इमोशनल पोस्ट केली आहे. त्यानं नानांच्या घरातला एक फोटो शेअर केलाय. त्या फोटोवर त्यानं लिहिलंय की, "देहाचा प्रवास संपला, पण तुझ्या कर्माचा प्रकाश कधीच संपणार नाही...", असं लिहिलंय. तर, बॅकग्राउंडला नानांच्या आवाजातील 'गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे...' ही कविता ऐकायला मिळतेय. 


दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थीव पुण्यात आणण्यात आलं आणि त्यांच्या डोणजे गावात, नानांच्याच शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नानांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झालीय. शिस्तप्रिय, स्पष्टवक्ता आणि सरळ पण थेट स्वभावाच्या या अवलियाच्या आठवणींनी भावूक करणाऱ्या या पोस्टवर कमेंट करुन चाहते नानांना श्रद्दांजली वाहताना दिसत आहेत. 


 


Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.