मुंबई:बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी नेहमीच सामाजिक मुद्द्यावर व्यक्त होत असताता. नेहमीत त्या रोखठोक मतं मांडताना दिसतात. आता त्यांनी धर्म, वैयक्तिक श्रद्धा आणि सरकारचा हस्तक्षेप या विषयांवर अत्यंत परखडपणे मत मांडलं आहे. "मी मुस्लिम आहे, मला ईद साजरी करायला, उर्दू भाषा आणि तिथली संस्कृती-खाद्यसंस्कृती आवडते; पण मी किंवा माझं कुटुंब नमाज पठण करत नाही, असे शबाना आझमी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.







एका या युट्यूब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी यांनी त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी वैयक्तिक आयुष्य ,करिअर कौटुंबिक वातावरणाचा उल्लेख केला.




शबाना यांचे वडील हे नास्तिक होते, तर त्यांची आई शौकत आझमी या धर्माचं पालन करत असल्या तरी कट्टर नव्हत्या.तर पती जावेद अख्तर हे देखील अत्यंत कट्टर नास्तिक आहेत, असं शबाना यांनी सांगितलं. बोलत असताना माझ्या तोंडून 'माशाअल्लाह' किंवा 'इन्शाअल्लाह' असं शब्द आल्यास जावेद यांना फार आवडत नाही, ते मला विचारतात की तू असं का बोलतेस? पण मला वाटतं की हे शब्द माझ्या भाषेचा भाग बनले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.






धर्मात सरकारचा हस्तक्षेप नको




तर देव किंवा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. जर कोणाला प्रार्थना करून मानसिक शांतता मिळत असेल, तर त्यात काही गैर नाही. पण धर्म हा पूर्णपणे वैयक्तिक विषय असून शासनानं यात हस्तक्षेप करू नये,असंही शबाना यांनी म्हटलं.



"लढा हिंदू-मुस्लिम नाही, तर पुरोगामी विरुद्ध असहिष्णू आहे"




यापूर्वी एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी देशातील धार्मिक वातावरणावर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, कट्टरपंथी मग ते हिंदू असोत वा मुस्लिम, दोघांनाही जावेद अख्तर आणि माझे विचार पटत नाहीत.




दरम्यान, जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे दांपत्य केवळ चित्रपटसृष्टीतील योगदानासाठीच नव्हे, तर भारतातील पुरोगामी विचार, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक चळवळींमधील सक्रिय सहभागासाठी ओळखले जातं. दोघेही स्वतःला नास्तिक मानतात. कोणत्याही एका धर्माच्या कट्टरतेला पाठिंबा न देता, हिंदू असो वा मुस्लिम, दोन्ही बाजूंच्या अतिवादावर आणि धर्मांधतेवर त्यांनी नेहमीच उघडपणे टीका केली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.