मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातल लोकप्रिय अभिनेते आनंद काळे यांनी नाट्यसृष्टी, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपली एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. सध्या ते चर्चेत आहेत, त्यांच्या आगामी नाटकामुळे. पण आता त्यांनी शेअर केलेली एक खास पोस्ट देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते.
आनंद काळे यांनी त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी यांचं कौतुक करत, या ३७ वर्षाच्या संसारात, प्रवासात दिलेली साथ बद्दल लिहिलं आहे.
काय म्हटलं आहे आनंद काळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये? या आमच्या श्रीमती. राधिका. माझी राधा...
३७ वर्षांची साथ...
लग्नाची ३१ वर्ष आणि त्या आधीची ६
सायकल पासून ते GLC पर्यंत मला दिलेली खंबीर साथ.
माझ्या आई वडीलांपासून ते यश आणि नील पर्यंत घरातल्या सगळ्यांची घेतलेली जबाबदारी, काळजी.
तू होतीस म्हणून मी आत्ता इथे आहे.
तुझ्यातला समजूतदारपणा ला सलाम.
सकाळची तुझी ३ तासाची स्वामींची पूजा ते रात्रीची ४ तासाची पार्टी...
तुझ्या सगळ्याच गोष्टी कमाल आहेत.
तुझ्यातला निरागसपणा आहे तसाच टिकवून ठेव.
आनंद काळे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तसंच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, त्यांना खरी ओळख आणि घराघरांत लोकप्रियता मिळवून दिली ती टेलिव्हिजन मालिकांनी. ईटीव्ही मराठीवरील चार दिवस सासूचे या मालिकेत त्यांनी साकारलेली 'अशोक देशमुख' ही भूमिका तब्बल ३,६०० हून अधिक भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. तर झी मराठीवरील या मालिकेत साकारलेली 'कोंडाजीबाबा फर्जंद' ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील 'विश्वजीत काका' या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा 'झी मराठी अवॉर्ड'ही मिळाला.
त्यांनी ३५ पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये काम केलं असून, 'पी से पीएम तक' या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. आनंद काळे हे केवळ अभिनेतेच नसून एक यशस्वी व्यावसायिक आणि लाईन प्रोड्युसर देखील आहेत. 'महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस' या त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी शूटिंग साहित्य व तंत्रज्ञान पुरवले आहे. यासोबतच कोल्हापुरात हॉटेल व्यवसायातही त्यांचा चांगला दबदबा आहे.