मुंबई : भारत वि. न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताने ४ विकेटने विजय मिळवत १-० ने आघााडी घेतलीय. या मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच शनिवारी होणार आहे. पण या सामन्याआधी भारतासाठी एक वाईट बातमी समोर आलीय. भारताचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. पहिल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयकडून याबाबत माहिती मिळाली आहे. कोण आहे तो खेळाडू जो दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
भारताचा मॅचविनर खेळाडू हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. बीसीसीआयने शुक्रवारच्या सकाळी जवळपास १० वाजता या गोष्टीची माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर दिली आहे की,ईशान किशन दुसऱ्या सामन्यात असणार नसल्याचं सांगितले. दुसऱ्या T20I मधून लो ग्रेड राईट ॲडक्टर स्ट्रेनमुळे त्याला बाहेर राहावं लागलं आहे. मालिकेतील तिसरा सामना मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. त्याआधी एका दिवसापूर्वी समजेल की तो तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही.
पहिल्या सामन्यात ईशान किशनला दुखापत झाल्याने त्याच्या जागी तिलक वर्माला प्रमोट केले गेले होते. त्यानंतर ईशानला खेळायला आला पण मोठी खेळी करू शकला नाही. ओपनर संजू सॅमसन, कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऑलराउंडर नमन धीर यांनी पहिला सामना भारताला जिंकवून दिला. ईशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्यातून बाहेर झाला आहे, तर मग वैभव सूर्यवंशीचे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे. तो ओपनर म्हणून खेळेल, तर सॅमसनला नंबर ३ वर पाठवले जाऊ शकते.
वैभव सूर्यवंशीची कामगिरीआयपीएल २०२६ मध्ये त्याने १६ सामन्यांत तब्बल ७७६ धावा कुटून 'ऑरेंज कॅप' आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा किताब पटकावला, ज्यामध्ये एकाच हंगामात ख्रिस गेलचा सर्वाधिक ७२ षटकारांचा विक्रम मोडण्याचाही समावेश होता. अंडर-१९ क्रिकेटमध्येही त्याने आपली छाप सोडताना २०२६ च्या आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला. त्याच्या या वादळी कामगिरीमुळे जुलै २०२६ मध्ये वयाच्या अवघ्या १५ वर्षे ९९ दिवसांत इंग्लंडविरुद्ध भारतीय टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे तो भारताचा आजवरचा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १८६.३६ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने २४६ धावा केल्या आहेत. वैभवला वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेतही संधी मिळाली नव्हती.